• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

जळगावात ५६ हजारांवर मूर्तींचे विसर्जन

Our Media by Our Media
September 25, 2021
in महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
86 1
0
जळगावात ५६ हजारांवर मूर्तींचे विसर्जन
13
SHARES
619
VIEWS
FBWhatsappTelegram

जळगाव : कोरोनाच्या सावटाखाली (Corona Crisis) सलग दुसऱ्या वर्षी मिरवणुकीविना पार पडलेल्या विसर्जन (Ganesh Visarjan) उत्सवात ५५ हजारांवर घरगुती व पाचशे सार्वजनिक गणेश मंडळांच्या (Ganesh Mandal) अशा ५६ हजारांवर गणेश मूर्तींचे विसर्जन रविवारी पार पडले. ‘बाप्पा चालले गावाला. चैन पडेना आम्हाला’ या भावनेतून विघ्नहर्त्याला गणेशभक्तांनी निर्विघ्नपणे निरोप दिला.

कोरोनाच्या सावटाखाली सलग दुसऱ्या वर्षी साधेपणाने साजरा झालेल्या गणेशोत्सवाची रविवारी सांगता झाली. आगमनाप्रमाणेच विसर्जन मिरवणुकीवर यावर्षीही बंदी घालण्यात आली होती. ढोल-ताशांवरही प्रतिबंध होते. त्यामुळे संपूर्ण उत्सवात भक्तिभाव असला तरी जल्लोष नव्हता. राज्यात लौकिक असलेली जळगावची विसर्जन मिरवणूक यंदाही झाली नाही.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

मूर्ती संकलन आणि विसर्जन

मिरवणूक व प्रत्यक्ष मेहरुण तलाव वा अन्य जलस्त्रोताच्या ठिकाणी थेट विसर्जनाला प्रतिबंध होता. त्या पार्श्वभूमीवर मनपाने घरगुती मूर्ती संकलनासाठी २८ ठिकाणी केंद्र उभारले होते. या २८ केंद्रांच्या माध्यमातून रविवारी दिवसभरात ५५ हजारांवर घरगुती मूर्तींचे संकलन करण्यात आले. मूर्ती वाहन नेण्यासाठी ३२ वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत विसर्जनाची प्रक्रिया सुरू होती.

४५० सार्वजनिक गणेश

शहरातील विविध भागातील ४५० सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीही संकलित करण्यात आल्या. या मूर्तींचे विसर्जनही मंडळाच्या कार्यकर्त्यांसह मनपाच्या टीमच्या सहाय्याने करण्यात आले. रात्री ११.४५ वाजता शेवटच्या गणपती मूर्तीचे विसर्जन पार पडले, अशी माहिती उपायुक्त श्‍याम गोसावी यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

निर्माल्यातून खत निर्मिती

महापालिकेने गेल्या काही दिवसांपासून मूर्ती संकलन व निर्माल्य जमा करण्याबाबत जनजागृतीपर मोहीम राबवली. त्यालाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. निर्माल्य संकलन व वाहून नेण्यासाठी वाहनांच्या १९ फेऱ्या झाल्या. त्याद्वारे ५0 मेट्रिक टन
निर्माल्य संकलित झाले. संकलित निर्माल्य शिवाजी उद्यानातील एका मोठ्या खड्ड्यात टाकून त्यात जीवामृताद्वारे प्रक्रिया करण्यात येणार असून १५-२० दिवसांत त्यापासून खत तयार होणार आहे.

यांचे लाभले सहकार्य

महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील व आयुक्त सतीश कुळकर्णी यांच्या महापालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नारीशक्ती, युवाशक्ती, विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल, वन्यजीव संरक्षण संस्था, जिल्हा प्रशासनाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग यांसह अन्य सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांची या कामी मोलाची मदत झाली. सुनील मंत्री यांनी कार्यकर्त्यांसाठी दोन्हीवेळच्या भोजनाची तर चहा-नाश्‍त्याची व्यवस्था महापालिकेने केली.

Tags: ganesh viserjan
Previous Post

करिअर मध्ये यशस्वी व्हायचे तर…

Next Post

अकोल्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले राजकुमार श्रीवास्तव यांच्या स्मारकाचे उदघाटन

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
अकोल्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले राजकुमार श्रीवास्तव यांच्या स्मारकाचे उदघाटन

अकोल्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले राजकुमार श्रीवास्तव यांच्या स्मारकाचे उदघाटन

ONLINE

Online learning : मुलांच्या द़ृष्टीदोषांत वाढ; तिरळेपणाचा धोका!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.