अकोला: अकोल्यातील सिंधी कॅम्प येथील पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार श्रीवास्तव हे गडचिरोली येथे कर्तव्यावर असतांना नक्षलवाद्यांसोबत सामना करतांना त्यांना वीर मरण आले होते.
गेल्या २९ वर्षांपूर्वी गडचिरोली येथे पोलीस विभागात आपले कर्तव्य बजावत असतांना नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सिंधी कॅम्प येथील रहिवासी राजकुमार श्रीवास्तव हे शहीद झाले होते.
त्यानंतर त्यांच्या घरच्यांनी तसेच कैलास टेकडी वासीयांनी गेल्या काही वर्षांपासून शहीद स्मारक उभे करण्यासाठी प्रयन्त केले होते. माजी नगरसेवक सुजितसिंग ठाकूर यांच्या प्रयत्नामुळे आज रोजी शहीद राजकुमार श्रीवास्तव यांच्या पुण्यतिथी निमित्त रीतसर शहीद राजकुमार श्रीवास्तव यांचे स्मारक उभे राहले. स्मारकाच्या उदघाटन प्रसंगी आ.गोवर्धन शर्मा, संजय बडोने, सिद्धार्थ उपरवट, आहुजा, राजकुमार मिश्रा, पुरुषोत्तम पांझाडे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सदर स्मारकाच्या उद्घाटनाचे आयोजन सागर श्रीवास्तव, धीरज विश्वकर्मा, अमित श्रीवास्तव मित्र परिवार यांनी केले होते.