तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा तालुका आजी माजी सैनिक संघटना कडून आज कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
२६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तान चा दारुण पराभव करीत कारगिल युद्ध जिंकले कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देत शहीद जवान यांना आदरांजली वाहण्यात आली.कारगिल विजय दिवस स्थानिक भागवत मंगल कार्यालय तेल्हारा येथे साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सुभेदार सुरेश जवकार हे होते तर प्रमुख उपस्थिती नगराध्यक्ष जयश्री पुंडकर,वैद्यकीय अधिकारी अशोक तापडिया,पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे, नायब तहसिलदार सुरडकर यांची होती.यावेळी सर्वप्रथम भारतमातेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.नगराध्यक्ष जयश्री पुंडकर,पोलीस उपनिरीक्षक,नायब तहसिलदार सुरडकर यांनी यावेळी उपस्थित युवक युवती नागरिक यांना कारगिल विजय दिवसाबद्दल मार्गदर्शनपर माहिती दिली.कार्यक्रमात देशभक्तीपर गितगायनाचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आजी माजी सैनिक संघटना गेल्या दोन वर्षपासून विद्यार्थी वर्गासाठी अनेक उपक्रम राबवून राष्ट्रीय पातळीवर अनेक विद्यार्थी संघटनेने खेळाच्या माध्यमातून चमकवले हे विशेष कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग खुमकर यांनी तर आभार प्रदर्शन दिनेश माकोडे यांनी केले.यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील आजी माजी सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.