तेल्हारा :- इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी अमरावती बोर्डाने ऑनलाइन घोषित केला आहे. स्थानिक सेठ बन्सीधर विद्यालय यांनी आपल्या यशाची परंपरा कायम राखली असून यावर्षी विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला आहे. यामध्ये ३४९ विद्यार्थ्यांपैकी ३४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये प्राविण्य श्रेणी १७५ विद्यार्थी आहेत. प्रथम श्रेणीत १७४ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांकावर कु.सानिका संजीव बगले (१००%) , कु.चैताली राजेंद्र कोरडे (१००%) व कु. मुक्ताई जिवन कौस्कार (१००%) द्वितीय क्रमांकावर अनुष्का विजय देशमुख (९९.६०%) श्रेया अनिल चहाजगुने (९९.६०%) व तृतीय क्रमांकावर वैष्णवी संजय देशमुख(९९.४०%) चौथ्या क्रमांकावर कु. विधि सतीश गोयनका(९९.००%) व पाचव्या क्रमांकावर कु. जागृती राजेंद्र कौलकार(९८.८०%) यांनी गुण संपादन केले आहे.
ऑनलाईन निकाल घोषित होताच सेठ बन्सीधर दहीगांवकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री बेनीप्रसादजी देवीलालजी झुनझुनवाला उपाध्यक्ष श्री.विलासरावजी जोशी व्यवस्थापक श्री.गोपालदासजी मल्ल कोषाध्यक्ष श्री.विठ्ठलराव खारोडे संचालक श्री राजेंद्रजी शाह श्री.पुष्कर तागडे सौ.अश्विनीताई विठ्ठलराव खारोडे श्री.अभिजित शाह श्री.विष्णू मल्ल श्री.डॉ. विक्रम जोशी श्री.शिवम पाडिया व मुख्याध्यापक श्री राजेंद्रकुमार केशवराव देशमुख तसेच सेठ बन्सीधर विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व सर्व विद्यार्थ्यांना शुभाशीर्वाद दिले व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा यावर्षी पहिल्या 5 मुलीच प्रथम ठरल्या.