राजस्थानच्या भरतपूरमध्ये एका तरूणीने तिच्या भावोजी विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. तरूणीने आरोप केला की, तिच्या भावोजीने तिला गोडगोड बोलून आधी सोबत नेलं आणि नंतर नशेचा पदार्थ देऊन तिच्यावर अनेकदा अत्याचार केला. इतकेच नाही तर तिचा अश्लील व्हिडीओही काढला. त्यानंतर आरोपीने जे केलं सर्वांनाच धक्का बसणारं होतं.
जेव्हा तरूणीचं लग्न ठरलं तेव्हा आरोपीने तिचं लग्न मोडण्यासाठी त्याने तिचा अश्लील व्हिडीओ व्हायरल केला. इतकेच काय तर तिचा व्हिडीओ तिच्या होणाऱ्या पतीलाही पाठवला. असे सांगितले जात आहे की, २१ वर्षीय तरूणी बीए फायनल वर्षाची विद्यार्थिनी आहे. येत्या २७ एप्रिलला तिचं लग्न होणार होतं.
हे पण वाचा : धक्कादायक: केली सहा जणांची हत्या, वडिलांनी घेतला मुलीच्या बलात्काराचा बदला.
तरूणीने सांगितले की, तिचा भावोजी अलवरचा राहणारा आहे. फेब्रुवारीमध्ये आरोपी भावोजी यादराम तिला अलवरला घेऊन गेला होता. अलवरला गेल्यावर तिच्यासोबत रेप केला आणि मोबाइलमध्ये तिचा अश्लील व्हिडीओ तयार केला. त्यानंतर तिला स्टेशनवर सोडून फरार झाला. आता जेव्हा तिचं लग्न होत आहे तर आरोपी भावोजीने तिचा व्हिडीओ व्हायरल केला. तसेच तिच्या होणाऱ्या पतीलाही तो व्हिडीओ पाठवला.
पोलीस अधिकारी नरेंद्र सिंह राजावत यांनी सांगितले की, एका तरूणीने तिच्या भावोजी विरोधात तक्रार दाखल केली आहे. तिने आरोप लावला आहे की, भावोजीने तिला नशेचा पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला. आता तिचं लग्न ठरल्यावर त्याने तिचा अश्लील व्हिडीओ व्हायरल केला. पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.