नवी दिल्ली : देशासह राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यावर बंदी आणली आहे. यामधून ९ उद्योगाना वगळण्यात आलं असून २२ एप्रिलपासून निर्णयाची अमलबजावणी होणार आहे.
केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून औद्योगिक वापरासाठी होणारा ऑक्सिजन पुरवठा थांबविण्यासाठी योग्य तो निर्णय घेण्यास सांगितले आहे. या निर्णयमध्ये एमपॉल्स व वायल्स, फार्मास्युटिकल, पेट्रोलियम रिफायनरीज, स्टील प्लांट्स, अणुऊर्जा सुविधा, ऑक्सिजन सिलिंडर उत्पादक, सांडपाण्याचे शुद्धीकरण प्रकल्प, अन्न व जल शुद्धीकरण, प्रक्रिया उद्योग प्रक्रिया उद्योग, यांना सूट देण्यात आली आहे.
वाचा : अकोला जिल्यात कोरोनाचे नवे ३९६ पॉझिटीव्ह तर ५ जणांचा मृत्यू
कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून देशात ऑक्सिजनच्या मागणीत वाढ होत आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांना ऑक्सिजनची खूप गरज आहे. केंद्राने गठीत केलेल्या ग्रुपने औद्योगिक वापरासाठी होणाऱ्या ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा देशातील वाढती मागणी करण्याच्या दृष्टीने हा आढावा घेतला आहे, असे अजय भल्ला यांनी सांगितलं आहे.









