हिवरखेड(बाळासाहेब नेरकर)- स्थानिक हिवरखेड येथे 2 फेब्रुवारी रोजी संत तुकाराम महाराज प्रबोधन समितीच्यावतीने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बाळूभाऊ चितोडे उपस्थित होते यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले.
संत तुकाराम महाराज यांनी संपूर्ण आयुष्यभर आपल्या अभंगाद्वारे जनजागृती केली व सतत अन्यायाला वाचा फोडली आणि प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक विचार करावा असा संदेश दिला, असे विचार आपल्या मनोगतामधुन संतोष शिंगणे यांनी व्यक्त केले. प्रत्येकाने संत तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या अभंगापैकी एक तरी अभंग पाठ करावा व त्याचा उपयोग जीवन जगताना आपल्या जीवनात करावा, हीच त्यांना जयंतीनिमित्त खरी आदरांजली ठरेल असे आव्हान लक्ष्मणराव धांडे यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमासाठी गजानन राऊत, दिलीप बाळापुरे, उमेश तिडके, श्याम चितोडे, राम चितोडे, प्रल्हाद नेमाडे, मयुर धांडे, ओम फोपसे तथा इतर समाज बांधव उपस्थित होते.