वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी कोरोना लसीचा (COVID-19 vaccine) पहिला डोस घेतला आहे. विशेष म्हणजे ७८ वर्षीय जो बायडेन कोरोना लस घेतेवेळी लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलं. बायडने हे कोरोनाच्या हाय रिस्कमध्ये येतात. त्यामुळे त्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे.
जो बायडन यांना फायजरकडून तयार केलेल्या कोरोना लसीचा डोस देण्यात आला. अमेरिकेत फायजरच्या कोरोना लसीला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. अमेरिकेतील जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी कोरोना लस लाईव्ह टीव्हीवर घेतली.
लसीचा डोस घेताना बायडन यांनी चिंतेचे कोणतेही कारण नसल्याचे म्हटले आहे. ज्यावेळी लस उपलब्ध होईल त्यावेळी ती सर्वांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी ट्विटद्वारे केले आहे.
अमेरिकेत कोरोनाचे सर्वांधिक रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर बायडेन यांनी, सर्व लोकांना कोरोना लस घेण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेत जानेवारीपासून कोरोना लस उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे.