बोर्डी(देवानंद खिरकर) – अकोट तालुक्यातील ग्राम बोर्डी येथे अवैध रेतिची वाहतुक सुरु असल्याची माहिती काल रात्री नायब तहसीलदार हरिष गुरव,नरसय्या कोंडागुर्ले यांना गोपनीय माहिती मिळाली त्या माहीती वरुन रात्री 11 वाजता बोर्डी फाटा, ते पोपटखेड रोड येथे 1 ब्रास गाळलेली रेतीची अवैध वाहतूक करताना वाहन क्रमांक MH 30 BB 0368 ट्रॅक्टर मालक शाम अर्जुन लटकुटे वाहन चालक आकाश रमेश भामोदकर यांचे कडून पकडून पोलीस स्टेशन अकोट शहर येथे लावण्यात आला आहे. सदर कारवाई नायब तहसिलदार तथा परी.तहसीलदार नरसय्या कोंडागुर्ले,मंडळ अधिकारी मनोहर अढाऊ,तलाठी विशाल शेरेकर, सिद्धांत वानखडे यांनी केली आहे.सलग तिसर्या दिवशी सुध्दा कललया धडक कारवाई मुळे बोर्डी,शिवपुर,रामापुर,परिसरातील अवैध रेती चोरांचे धाबे दणाणले आहेत.तसेच बोर्डी येथिल लाडेगावची नदी,बोर्डी ते रामापुर रोडवरील घोगानाला,सुकळी येथिल मोहाळी नदी,शिवपुर ते शहापूर येथिल धोर्ळिची नदी या मधुन कित्येक दिवसान पासुन रेतिची चोरी करुन विक्री करण्याचा व्यवसाय जोरात सुरु आहे.या बाबत वेळोवेळी वृत्त सुध्दा प्रकाशीत करण्यात आले होते.व काही लोकांनवर थातुरमातुर कारवाई सुध्दा झालेली आहे.परंतू दोनतिन वेळा दंडात्मक कारवाई करुन सुध्दा या रेती चोरट्यानवर काहीही फरक पडत नसल्याचे चित्र आहे.तरी आता यांच्या विरुध्द फौजदारी कारवाई करने अपेक्षीत आहे.तरी या बाबत तहसीलदार निलेश मडके हे कुठली कारवाई करतात या कडे लक्ष लागले आहे.