अकोला – रोजगाराच्या विविध संधी तसेच विविध क्षेत्रात रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करुन देण्यांच्या दृष्टीने राज्यात 12 व 13 डिसेंबर 2020 रोजी दोन दिवसांच्या कालावधीत एक राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, आयुक्तालय नवी मुंबई याचे विद्यमाने करण्यांत आलेले आहे
सदर मेळाव्यामध्ये नामांकित खाजगी उद्योजक, कंपनी व त्यांचे प्रतिनिधी विविध पदासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबवतील. दहावी, बारावी, आय.टी.आय.,पदवीका व पदवीधारक पात्र पुरुष व महिला उमेदवारांना ऑनलाईन अप्लॉय करुन या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होता येईल.
कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या – www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नांव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, पदवी, आयटीआय पास, पदवीका, पदवी पुरुष तसेच महिला उमेदवारांनी आपल्या सेवायोजन कार्ड ( Employment Card ) चा युझर आयडी व पासवर्डचा वापर करुन आपल्या लॉगीन मधुन ऑनलाईन अप्लॉय करु शकतात. ऑनलाईन अप्लॉय केलेल्या उमेदवारांच्या कंपनी, उद्योजक व एच.आर.प्रतिनिधी यांचे कडून ऑनलाईन मुलाखती घेऊन निवड प्रक्रीया राबवितील. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी आपल्या शैक्षणीक पात्रतेच्या आधारे ऑनलाईन अप्लॉय करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रां.यो.बारस्कर यांनी केले आहे