अकोट(देवानंद खिरकर)-योग योगेश्वर संस्थांमध्ये भागवत कथेची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली असून गेल्या सात दिवसात संस्थांमधील भागवत कथेमध्ये कोरणा योद्धा पुरस्काराचे नियोजन करण्यात आले होते .त्यामध्ये ज्यांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेचा जीव वाचण्याकरिता स्वतःचा जीव धोक्यात टाकून रात्रंदिवस जनतेची सेवा केली आहे त्यांना योग योगेश्वर संस्थांच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये डॉक्टर,पोलीस,आषावर्कर,पत्रकार, विद्युत विभाग,महानगरपालिका, समाजसेवक अषा अनेक मान्यवरांचा समावेश करण्यात आला होता. प्रत्येकाने कोरोणा कालखंडामध्ये त्यांना आलेले कटु अनुभव व्यक्त केले .भागवत कथेच्या सांगतेला काल्याच्या कीर्तना मध्ये गणेश महाराज शेटे यांनी सांगितले महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्रातील जनतेचा फक्त संत वचनावरच विश्वास आहे वारकरी सांप्रदाय ने आज पर्यंत परमार्था सोबतच सामाजिक उपक्रम राबवित समाज प्रबोधनाचे फार मोठे कार्य केलेले आहे व पुढेही करत राहणार आहे.आज जवळ जवळ सात महिने झाले पण लोकांच्या मनातील कोरोणा बद्दलची भीती मात्र कायमच आहे. सर्व जनतेचे जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि सातत्याने सात महिन्याच्या लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य माणसाची आर्थिक परिस्थिती सुद्धा खूप ढासळलेली आहे .बऱ्याच माणसांचे मनोबल खचलेले असून जनतेच्या जीवनामध्ये निराशा आल्यासारखे दिसून येत आहे आणि म्हणून कोरोना कधी संपणार, यावर कधी लस येणार,आपल्या संसाराचा गाढा कसा चालवता येणार हा फार मोठा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झालेला आहे.आणि या सर्व प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्रात वारकरी संप्रदायातील कीर्तनकार हे जनतेला चांगल्या पद्धतीने देऊ शकतात. आणि म्हणून राज्य सरकारने महाराष्ट्रातील कीर्तनकार मंडळीला नियम व अटी लाऊन रीतसर कथा, कीर्तनाची परवानगी जर दिली तर महाराष्ट्रातील कीर्तनकार भविष्यात आपल्याला कोरोणा सोबतच जीवन जगावे लागणार आहे आणि ते कशा पद्धतीने जीवन जगता येईल हे फक्त किर्तनकार चांगल्या पद्धतीने जनतेला समजावून सांगेल.संसारिक जीवनामध्ये मानवाला अध्यात्माची जोड असल्याशिवाय जीवनात आनंद प्राप्त होत नाही.कारण की वारकरी संप्रदाय मधील थोर संत ज्ञानेश्वर महाराज,जगद्गुरु तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज ,संत जनाबाई ,संत एकनाथ महाराज आदी करून सर्व संतांनी आपल्या अभंगांच्या माध्यमातून आचार,विचार,व्यवहार,शिस्त, शारीरिक स्वास्थ्य आणि विज्ञान व परमार्थची सांगड कशी आहे शिकवण दिलेली आहे.त्याच संत वचनाचा सखोल अभ्यास करून महाराष्ट्रातील कीर्तनकार जनतेचे जीवन पुन्हा सुधारण्या करिता कंबर कसून प्रबोधनाच्या माध्यमातून सरकारला फार मोठे सहकार्य करतील आणि म्हणून सरकारने या बाबीचा गांभीर्याने विचार करून महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्याकरिता कीर्तनकार मंडळींना कथा,किर्तनाला रीतसर परवानगी देऊन जन सेवेची संधी द्यावी असे विचार काल्याच्या कीर्तना मध्ये गणेश महाराज शेटे यांनी व्यक्त केले.