तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा तहसीलदार राजेंद्र सुरडकर यांची बदली झाल्याने तहसीलदार पदी कोणाची वर्णी लागणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते मात्र अखेर आज परीक्षाविधीन तेजश्री कोरे (उपजिल्हाधिकारी)यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सन २०१९ च्या राज्य सेवा परीक्षा द्वारे उपजिल्हाधिकारी पद मिळालेल्या तेजश्री कोरे यांच्याकडे सहा महिन्यांकरिता तेल्हारा तहसीलदार पदाची धुरा देण्यात आली असून आज दि १३ ऑक्टोबर रोजी त्यांनी रुजू होऊन आपली जबाबदारी स्वीकारली त्यामुळे तहसीलदार पदी कोण येणार या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे.
वाळूमाफियांमध्ये धास्ती
तेल्हारा तहसीलदार सुरडकर यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी कोण येणार याबाबत संबंधित असलेल्यामध्ये चर्चा गेल्या आठ दिवसांपासून रंगली होती.”देव न करो कोरे मॅडम न येवो” असे वाक्य हे गेल्या काही दिवसांपासून वाळूमाफियांच्या गोट्यात बोलल्या जात होते तसेच वाळूमाफिया मध्ये तहसीलदार पदी रुजू झालेल्या कोरे यांच्या नावाची चर्चा होती मात्र ती पण भीतीपोटी त्यांची कारकीर्द बघता आपण आपले धंदे कसे चालवावे हा एक प्रश्न त्याच्या मनात असल्याचे तालुक्यातील वाळूमाफियांच्या चर्चेवरून स्पस्ट झाले होते.त्यामुळे तहसीलदार पदी तेजश्री कोरे यांची नियुक्ती झाल्याने वाळूमाफियांच्या मनात धास्ती बसली असून तहसीलदार कोरे ह्या आपल्या सहा महिन्यांच्या कारकिर्दीत तहसीलदार पदाची धुरा कशा सांभाळणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष असणार आहे.