अकोला – महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभ मिळण्यासाठी शिल्लक पात्र खातेदारांनी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात 3 हजार 410 लाभार्थी आधार प्रमाणीकरण करणे शिल्लक आहे. अशा सर्व पात्र शेतकऱ्यांनी येत्या आठ दिवसात जवळच्या सि.एस.सी. किवा आपले सरकार सेवा केंद्र आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे. आधार प्रमाणिकरण न केल्यामुळे लाभार्थी योजनाच्या लाभापासून वंचित राहिल्यास तक्रारीचा नंतर विचार केला जाणार नाही याची नोद घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अकोला यांनी केले आहे.
मयत झालेल्या कर्जदारांच्या बाबतीत त्यांच्या वारसांनी संबंधित शाखा व्यवस्थापक किवा सेवा संस्थेचे सचिव यांचेशी संपर्क साधावा. बँकेच्या प्रक्रियेनुसार आवश्यक कागदपत्रे बँकेकडे जमा करुन मयत कर्जदारांच्या कर्जखात्यावर वारसांची नोंद करून घ्यावी. त्यांनतर बँक सुधारीत माहिती पोर्टलवर अपलोड करु शकते.
आधार प्रमाणीकरण संदर्भात काही अडचणी असल्यास आपल्या बँक शाखेच्या व्यवस्थापक किवा सेवा सहकारी संस्थेचे सचिव किवा तालुका उपसहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय किवा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधावा.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी सध्या सुरु असून सदर योजना दि. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 कालावधीत कर्ज घेतलेल्या व दि. 30 सप्टेंबर 2019 पर्यत व्याजासह 2 लक्ष पर्यंतचे थकीत कर्जाची रक्कम संबंधित पात्र शेतकऱ्याचा कर्ज खात्यावर शासनातर्फे वर्ग करण्यात येते. सदर योजनेअंतर्गंत संबधीत बँकेनी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर शेतकऱ्याचा डाटा भरलेला असून त्यांची छाननी करुन पात्र शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आले आहे.
महात्मा फुले कर्जमुक्ती योजना 2019 चा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थी यादीतील शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर शेतकऱ्याच्या कर्जखात्यात रक्कम करण्याची कार्यवाही सूरु होते. आधार प्रमाणीकरण करताना पोर्टलवरील माहिती काळजीपूर्वक अवलोकन करावे. व लाभाची रक्कमेची तपासणी करावी. बँकेने भरलेल्या माहिती आधार क्रमांक किवा रक्कम चूकीचे असल्यास केन्द्र चालकास सांगून अनुक्रमे आधार अमान्य व रक्कम अमान्य असा पर्याय निवडवा. असा पर्याय निवडल्यावर त्याची ऑनलाईन तक्रार जिल्हा स्तरीय समितीकडे वर्ग केली जाते. त्यांची पावती शेतकऱ्यांना मिळते. आधार क्रमांक व रक्कम योग्य असल्यास आधार प्रमाणीकरन यशस्वीपणे पूर्ण झाल्याची पावती मिळते. आधार प्रमाणीकरण करतांना बोटांचे ठस्से जुडत नसल्यास त्यांचीही ऑनलाईन तक्रार आपल्याच तालुक्यातील तहसिलदाराकडे वर्ग केली जाते. तरी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभ मिळण्यासाठी शिल्ल्क पात्र खातेदारांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.