हिवरखेड (प्रतिनिधी)- अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत राजकारणाचा गड समजल्या जाते. येथील राजकारणात आपले वर्चस्व सिद्ध करण्याची चढाओढ नेहमीच बघावयास मिळते. त्या अनुषंगाने येथे नेहमीच आरोप-प्रत्यारोप, तक्रारी, चौकशी, पात्र- अपात्र, इत्यादींमुळे येथील राजकीय वातावरण तापलेले असते.
विरोधी गटातील सौ सुलभा रमेश दुतोंडे, उपसरपंच डॉ. शकील अली मिरसाहेब, सौ शिल्पाताई मिलिंद भोपळे, सौ प्रतिभाताई विरेंद्र येऊल, सौ. सविताताई सुनील इंगळे, पंकज एकनाथ तिडके, दशरथ ईश्वर गावंडे,
ह्या 7 ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत सरपंच स्वर्ण प्रयोग करे ग्राम विकास अधिकारी भीमराव गरकल मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकारी या चार जणांविरोधात एलईडी लाईट खरेदीतील घोळ आणि इतर काही प्रकरणे अशा स्वरूपाची तक्रार अमरावती विभागीय आयुक्तांकडे केली होती. दिनांक सात
सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्तांनी महत्वपूर्ण प्रकरण निकाली काढत आदेश पारित केले. ज्यामध्ये सरपंच सौ अरुणाताई सुरेश ओंकारे यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे आणि अनियमितता केल्याचे दोषी आढळल्याने त्यांना सरपंच आणि ग्राम पंचायत सदस्य ह्या पदावरून अपात्र घोषित केले. एव्हढेच नव्हे तर सरपंच सौ ओंकारे आणि ग्रामविकास अधिकारी भीमराव गरकल ह्यांनी अनियमितता केलेली आणि चौकशीत घोळ सिद्ध झालेली जवळपास पावणे पाच लक्ष रुपयांची रक्कम दोघांकडून वसुलीची कार्यवाही करण्याचे आदेश सुद्धा अमरावती विभागीय आयुक्तांनी अकोला जिल्हा परिषदेच्या सीईओ यांना दिले आहेत