कोरोना अलर्ट
आज मंगळवार दि. ८ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-३२०
पॉझिटीव्ह- ७७
निगेटीव्ह-२४३
अतिरिक्त माहिती
आज सकाळी ७७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २२ महिला व ५५ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील १५ जण मुर्तिजापूर येथील, गौरक्षण रोड येथील सात जण, डाबकी रोड व पातूर येथील पाच जण, महान व लहान उमरी येथील प्रत्येकी तीन जण, तोष्णीवाल लेआऊट, जीएमसी क्वॉटर, कौलखेड, पळसोबढे, जवाहर नगर, शेकापूर ता. पातूर, केशव नगर, रणपिसे नगर व पार्वती नगर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित वासूदेव नगर, बार्शीटाकळी, साखरविरा, मोठी उमरी, सिंधी कॅम्प, आलेगाव, नागे लेआऊट, व्हिएचबी कॉलनी, गोयका नगर, भंडारज ता. पातूर, आरपिटीएस, गजानन पेठ, स्टेशन रोड, राजूरा प्लॉट,रेडवा ता. बार्शिटाकळी,सोपिनाथ नगर, खडकी, कृषी नगर, वाशिम बायपास, न्य तारफैल व खेतान नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण लहान उमरी, अकोला येथील ६७ वर्षीय पुरुष असून तो दि. ६ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला.
दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात १६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ३८७०+८०९+११४=४७९३
मयत-१६७
डिस्चार्ज- ३५५८
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-१०६८
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!