मुर्तिजापुर (सुमित सोनोने)– येथील नगर परीषदेत ९६ चतुर्थ श्रेणी सफाई कामगार आपले काम यशस्वी पणे करीत आहेत.पण त्यांना नगरपरीषदेकडुन कोणत्याही प्रकारची मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत नाही.एवढेच नव्हे तर त्यांना नियमित पणे वेतन देण्यास न.प.असमर्थ ठरत असल्याची तक्रार युवा सामाजिक कार्यकर्ते शिवा दिपक बोयत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कडे करून न्यायाची मागणी केली आहे.
मूर्तीजापुर नगर परीषदेत एकुण ९६ चतुर्थ श्रेणी सफाई कामगार काम करीत असुन त्यांना नगर परिषद कडुन मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने त्यांना नेहमी आर्थिकदृष्ट्या अनेक अडीअडचणी स सामोरे जावे लागत आहे. जसे त्यांना महीण्याकाठी वेतन दिले जात नाही. मागील ७/८ वर्षांपासून सफाई कामगारांना आरोग्य विषयक कुठल्याही सेवा सुविधा आणि पोषाख मिळत नाही. याबाबतची सर्व बिल न.पा.प्रशासन काढतात ही रक्कम जाते कुठ हेआम्ही अशिक्षित असल्यामुळे आम्हाला कळत नसल्याचे तक्रारीत स्पष्ट नमूद केले आहे. प्रोव्हीडंट फंडची सन २००५ पासून आणि सीपीएफ अंशदान ची रक्कम १३% न.प.१०% कर्मचारी अधापही मिळालेली नाही. याविषयी न प.प्रशासनाला माहिती मागीतली असता ती देण्यास टाळाटाळ केली जाते. यामध्ये ६६ कर्मचारी यांचे सीपीएफ कपात होते.परंतु याविषयी रेकॉर्ड मागीतले असता दिल्या जात नाही. त्यामुळे सफाई कामगार अडचणीत आले आहे. सफाई कामगारांना मुलभूत सुविधा आहे वेतनापासुन का वंचित ठेवल्या जात हे कळेनासे झाले आहे. न.प. मध्ये कार्यरत असतांना अकस्मात मुत्युमूखी झाल्यानंतर आणि स्व ईच्छेने सेवानिवृती घेणारे व हककाची रजा घेणारे व आजारी रजा या संदर्भात नियमानुसार मिळणारी रजा ही गेल्या ५/६ वर्षांपासून याकरिता मिळणारी रक्कम अधापही चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना मिळाली आहे. आणि अधिकारी यांना मागणी केल्यास आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. सफाई कामगार हे समाजातील उपेक्षित घटक आहेत. ते समाजाची सेवा करतात. जे काम कोणीही करू शकत नाही ते काम सफाई कामगार करीत आहे. मग त्यांच्यावरच अन्याय का ??? सफाई कामगारांच्या मुलाबाळांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाही. ते भूमिहीन, बेघर आहेत. त्यांना हक्काचे घर नाही.घरकुल किंवा म्हाडा अंर्तगत काँलनी मिळावी.असेही तक्रारीत नमूद आहे. आमच्या प्रलंबित मागण्यांचा शासन प्रशासन स्तरावर प्राधान्याने मांडुन यावर विचार व्हावा.आणि आमच्या उपेक्षित समाजाची मागणी करण्यात आली आहे. जर शासन प्रशासनाने याची वेळीच दखल न घेतल्यास आम्हाला शासन विरोधात तालुका व जिल्हा स्तरांवर आंदोलन सुरू करावे लागेल.असे ही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.तक्रारीच्या प्रति मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,नगरविकास मंत्री, पालकमंत्री बच्चु कडु,अमोल मिटकरी आमदार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी अकोला, उपविभागीय अधिकारी मूर्तीजापुर, मुख्याधिकारी न.प.मूर्तीजापुर यांनीही देण्यात आल्या आहेत. तक्रारीवर संपूर्ण सफाई कामगारांच्या स्वाक्षरी आहेत.अशीच एक तक्रार अखील भारतीय सफाई मजदूर संघटनेकडून देखील करण्यात आली आहे. त्यावर संघटना अध्यक्ष राजु मिलांदे,उपाध्यक्ष रवि सारवान,सचिव गणेश पिवाल यांच्या स्वाक्षरी आहेत.