मुर्तिजापूर (सुमित सोनोने)- दरवर्षी प्रमाणे या वर्षीसुध्दा स्थानिक मुर्तिजापूर मतदार संघाचे आमदार व माजी आमदार यांनी स्थानिय दलीत वस्तीत जावून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा केला. मुर्तिजापूरचे आमदार हरीष मारोतीअप्पा पिंपळे व माजी आमदार तुकाराम बिडकड हे मागील 13 वर्षाणासुन सतत न चुकता मुर्तिजापूर मतदार संघातील लकडगंज जुनी वस्तीच्या दलीत वस्तीत जावून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करतात.वर्षभर हे लोक आपल्या कार्यात मग्न असतात परंतू रक्षाबंधनाच्या दिवशी हे आपल्या बहीणींना भेटण्यासाठी त्यांच्या घरी भेट देतात च त्यांच्या समस्या जाणुन घेतात.
या वर्षी सुध्दा रक्षा बंधनाच्या निमित्त जेष्ठ समाज सेविका श्रीमती वैजंताबाई विश्वनाथ डोंगरदिवे यांच्या निवास स्थानावर रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी आमदार हरीष मारोतीअप्पा पिंपळे माजी आमदार तुकाराम बिडकड, समाजसेवक कमलाकर गावंडे, अॅड.चंद्रजित देशमुख,कैलाश महाजन,अनिल चावला,संतोष कपिले,रोहीत सोळंके,गजानन बेलखेडे आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता गजानन बेलखेडे यांनी मोलाची भूमिका बजावले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार गजानन बेलखेडे यांनी मानले.










