तेल्हारा – तेल्हारा तालुक्यातील सांगवी शिवारातील पूर्णा नदीचे पात्रात एका पस्तीस वर्षीय युवकाचा मृतदेह सापडला असून त्या मृतदेहाची ओळख पटवणे सुरू आहे
तेल्हारा तालुक्यातील सांगवी शिवारातील
पूर्णा नदी पात्रात एका युवकाचा मृतदेह मिळून आला त्याची उंची पाच फुट दोन इंच वर्ण सावळा अंगात चौकडी चे शर्ट काळा फुल पॅन्ट पायात काळा बूट वय अंदाजे 35 वर्ष या वर्णनाचा अज्ञात इसम तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीतील सांगवी शिवारातील पूर्णा नदीचे पात्रात आढळून आल्याने अशा वर्णनाचा व्यक्ती कुठूनही हरवल्या असल्यास तेल्हारा पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आव्हान पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन तेल्हारा यांनी केले आहे