मुर्तिजापूर (सुमित सोनोने)- सध्या कोरोणा विषाणूच्या संसर्ग थांबवण्याकरता लाॅकडाऊन सुरू आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून वर्क फॉर्म होम याअंतर्गत शेतकऱ्यांना उत्कृष्ट चारा बनवण्याचे तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले.
सांजापूर येथील कृषिदूत आशिष जगदेव गवई हा विद्यार्थी श्रीमती सुमित्रा अंधारे कृषी महाविद्यालय शिर्ला येथील तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी असून ‘ग्रामीण कृषि कार्यानुभव’ या उपक्रमांतर्गत सांजापूर येथील शेतकऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात निकृष्ट चाऱ्याचे रूपांतर सकस व असलेल्या पोषण मूल्यांचा पूर्ण उपयोग करण्यासाठी चाऱ्यावर प्रक्रिया केल्यास निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढते याविषयी प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले. यावेळेस सरपंच कैलास मालवे, ग्रामपंचायत सदस्य तसेच शेतकरी जगदेव गवई, लखन मुंडे, मंगेश जोगी, बंडू मस्के, छोटू तायडे उपस्थित होते.