अकोला- एका हप्त्यात पातुर पोलीस ठाण्यातील दोन कर्मचारी लाचप्रकरणी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने पोलीस विभागाची प्रतिमा मलिन होऊन प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.अशातच पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना पोलिस अधीक्षक गावकर यांनी कंट्रोल रूम अटॅच केले.
पोलिस कर्मचारी विविध कारणासाठी लाच घेताना आढळलेआणि रंगेहात पकडल्या सुद्धा गेले लाच लुचपत विभागाने कारवाई केली आणि पोलिस दलाची नाहक बदनामी झाली अशातच पोलिस कर्मचारी लाच मागत आहे याचा अर्थ ठाणेदाराचा त्यांना वदरहस्त होता की नाही याची देखील चौकशी गरजेचे आहे. दरम्यान, येथील पातूर येथील ठाणेदाराला थेट कंट्रोल मध्ये अटॅच करुन पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांनी योग्य ते पाऊल उचलत योग्य तो संदेश विभागातील लाचखोर पोलिसांना दिला आहे.
धाबा चालकाला धाबा रात्री अकरा नंतर सुरु ठेवण्यासाठी लाच मागणार्या पोलिस कर्मचार्याच्या वृत्ताची शाई वाळत नाही तोच गुरुवारी आणखी एका पोलिस कर्मचार्याने गुन्हा दाखल होऊ नये म्हणून सहा हजारांची लाच मागितली या दोन्ही प्रकरणात पोलिस दलाची नाहक प्रतिमा मलिन जिल्ह्यात झाली आहे. या दोन कर्मचार्यांना नेमका वरदहस्त कोणाचा होता याची देखील चौकशी होण्याची गरज आहे. पातूर तसे म्हत्वाचे पोलिस स्टेशन असून येथे धडक कारवाई करण्यासाठी सक्षम अधिकार्याची गरज आहे. त्याच बरोबर येथील गंभीर तक्रारी लोकप्रतिनिधी पण करत आहे. असे असताना नियुक्त अधिकार्यांच्या कामाची चौकशी होण्याची गरज आहे. पोलिस अधिकारी कर्मचारी गुन्हेगारी कमी करण्यासाठी आहे की हप्तेखोरीसाठी, लाच मागण्यासाठी असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे. त्यामुळे आता पातूर पोलिस पोलीस ठाणे दलाचे शुध्दीकरण आवश्यक असून गेल्या अनेक दिवसांपासून एकाच ठिकाणी बसलेल्यांना बदलण्याची मागणी पुढे या निमित्याने येत आहे.
तर या आधी पत्रकाराला धमकावणे तसेच गोवंश तस्करी यामुळे ठाणेदार गुल्हाने चांगलेच चर्चेत येऊन वादग्रस्त ठरले होते हे विशेष तसेच पातुर पोलीस ठाण्याची जबाबदारी गजानन ठाकूर यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे समजते.