अकोट (देवानंद खिरकर )- अकोला जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख तसेच पातूर बाळापूर मतदार संघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार मा.श्री.नितीन देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या आवाहनाला अनुसरून आज अकोट शिवसेनेच्या वतीने अग्रेसन भवन कबुतरी मैदान अकोट येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी १५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले सहकार्य देत शिबिर यशस्वी केले.शिबिराला मा.आमदार नितीन देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली व आयोजकांचे आभार मानले तसेच शिबिर स्थळी स्वच्छता पाळण्यात आली त्याबद्दल विशेष कौतुक केले तसेच या कोरोना परिस्थितीत अकोला जिल्ह्याला रक्ताचा पुरवठा कमी पडू देणार नाही असे आश्वासीत केले.
या शिबिराला उद्घाटक म्हणून मा.आमदार संजय गावंडे हे लाभले होते.तसेच याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना नितीन देशमुख यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या त्यासोबत नितीन देशमुख हे आज जिल्हातील प्रत्येक शिवसैनिकांची जान आहे व त्यांच्या वाढदिवसानिमित्य या कोरोना प्रादुर्भाव संकटकाळात रक्तदान करणे हा आमचा सन्मान आहे. आ.नितीन देशमुख यांच्या हातून अशीच समाजसेवा घडत राहावी अशा भावना व्यक्त केल्या.राज्यात कोरोना परिस्थिती पाहता आरोग्य विभागाला रक्त पुरवठा कमी पडण्याची शक्यता असल्याकारणाने या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सौ.मायाताई म्हैसने यांनी शिबिराला उपस्थिती लावत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोरोना लढाईला सहकार्य करण्यासाठी तसेच लॉकडाऊन काळात राज्यात रक्ताचा तुटवडा होण्याची शक्यता असल्याने अकोट शिवसेनेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज सुरक्षित अंतर ठेवत आणि स्वच्छता बाळगत हा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविला त्याबद्दल आयोजकांचे आभार मानले.
या शिबिराला उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर,तालुका प्रमुख श्याम गावंडे,शहर प्रमुख सुनील रंधे,अकोला शहर प्रमुख अतुल पवणीकर,राहुल कराडे अकोला युवासेना उपजिल्हा संघटक,जि.प.सदस्य डॉ.प्रशांत अढाउ,सरपंच संजय गयधर,राजू अंभीर मोरे,अतुल पांडे,ज्ञानेश्वर बोरोकार,विक्रम जायले,तुषार पाचकोर,पं.स.सदस्य ज्ञानेश्वर दहीभात,रमेश पाटील खिरकर,विजय ढेपे,कुणाल कुलट,अमोल बदरखे,दिनेश बोचे,संतोष जगताप,रोशन पर्वतकर,अनिल जवंजाळ,उमेश आवारे,पिंटू पालेकर,मंगेश दहीभात,देवानंद मोरे,कमल भास्कर,प्रदीप कदम,प्रशांत येऊल,पप्पू थोरात,नंदू कुलट,गोपाल कावरे,शुभम म्हैसने,अक्षय वाघोडे,जगदीश वानखडे,बाबाराव काळे,सचिन वानखडे,निलेश गौड,बाळासाहेब नाठे, देव नृपणारायन,विजय भारसाकळे,संजय वानखडे,राजू थोरात,किरण शेंडे,चेतन कुटे,पवन रंदे,सतीश अस्वार, भिकू गटकळ,रोहन पौळ,मिलिंद बरेठिया,अमेय म्हैसने,सत्यवान पुंडकर,नरेंद्र काकड,संतोष बुंदेले,संकेत पाखरे,सोपान पोहरे,चेतन कुटे,आशिष उखळकार,प्रफुल बोरकुटे,प्रशांत बोरखडे,अंकित आवारे,ऋषिकेश लोणकर,शुभम सुरत्ने,प्रशांत येऊल,राजू कुलट,विशाल ढोले,विजय कांगळे,चंद्रकांत शिंदे,संकेत राऊत,प्रफुल म्हैसने,जीवन दिवेकर,तेजस गाढे,राजू थोरात,मयुर महल्ले,प्रमोद वानखडे,सतीश अस्वार,बादल हातेकर,कार्तिक खडेकार,दीपक नेरकर,गजानन रंदे,अनिकेत कुलट,अमोल कराळे,यांच्यासह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिकांनी उपस्थिती लावली.शिबिर स्थळी सोशल डिस्टक्सिंग ठेवून उपस्थित सर्व मास्क बांधून होते तसेच सॅनिटायजर ने प्रत्येकाला स्वच्छ करण्यात येत होते.शिबिर यशस्वी करण्यासाठी मुख्य आयोजक शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे,तालुका प्रमुख श्याम गावंडे,शहर प्रमुख सुनील रंदे यांच्यासह अकोट शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.यावेळी शासकीय महाविद्यालय अकोला व सर्वोपचार रुग्णालय अकोला यांच्या रक्तपेढी चमू व डॉक्टरांनी सहकार्य केले.










