• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

बाल कल्याण समितीच्या सजगतेने अल्पवयीन बालिकेची सुटका

Media Desk by Media Desk
June 5, 2020
in Featured, अकोला शहर
Reading Time: 1 min read
79 1
0
बाल कल्याण समिती
12
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.5– जिल्हा महिला व बालविकास अधिकारी  योगेश जवादे  यांना बाळापूर हायवे रोडवर रिधोरा नजीकच्या पेट्रोलपंपाजवळ अल्पवयीन  मुलीस पळवून नेत असल्याची माहिती दि. २९ मे रोजी  प्राप्त झाली. ही माहिती प्राप्त होताच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी  राजु लाडुलकर व नितीन अहिर यांनी घटनास्थळी जाऊन परिसरातील नागरीकांशी संवाद साधुन माहिती घेतली.  त्यात दोन अल्पवयीन  बालिका रडत असल्याचे आढळून आले. त्यांना विचारपूस केल्यावर त्यांनी सांगितले की, त्यांना एक ट्रक  चालक जबरदस्तीने घेऊन जात आहे.  अधिक चौकशी अंती माहिती मिळाली की,  त्या मुली कल्याण मुंबई  येथुन आपल्या मैत्रीणींसोबत सैलानी यात्रा करून अकोला येथे आल्या होत्या.

त्यानंतर लॉकडाऊन च्या काळापासुन त्या अकोला शहरात  अकोट फैल येथेच एका कुटुंबात राहत  होत्या. एके दिवशी मुलीच्या आईने कल्याण वरून मुलींना  आणण्याकरीता  एका ट्रकचालकाला 30  हजार रूपये दिले असल्याचे मुलीने सांगितले.  तो ट्रकचालक दारूच्या  नशेत होता.  ट्रकचालकाने मुलीसोबत काही अश्लील चाळे केल्यामुळे घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा  केल्याने ट्रकचालक तेथुन पसार झाला.  त्यानंतर मुलींना  विश्वासात  घेऊन माहिती गोळा केली. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने  संबंधीत पोलीस स्टेशनला  संपर्क करून घटनेची  माहिती देण्यात आली. जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी योगेश जवादे,    बाल कल्याण समिती अध्यक्ष पल्लवीताई कुळकर्णी यांनी  तात्काळ सूत्रे हलवून दोन्ही अल्पवयीन  मुलींना तात्पुरत्या  स्वरूपात बालीकाश्रमामध्ये दाखल केले.  या प्रकरणामध्ये  रिधोराचे पोलीस पाटील  देशमुख,स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सपकाळ तसेच बाळापूर येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिंदे यांनी महत्वपुर्ण योगदान दिले. सद्यस्थितीत अल्पवयीन बालीका ह्या बालीकाश्रमात दाखल असुन सुरक्षित  ठेवण्यात आले. आता ह्या बालिकेला तिच्या आईवडीलांच्या ताब्यात देण्यात आले आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी योगेश जवादे यांनी सांगितले.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

जिल्ह्यामध्ये बालकांवर होणारे  लैंगिक अत्याचार, तसेच परिस्थितीमुळे अल्पवयातच होणारे बालविवाह, बालकामगार, काळजी व संरक्षणाची गरज  असलेले बालके, बालकांनी अवैधरीत्या होत  असलेली विक्री  ही गंभीर बाब असुन यांना  प्रतिबंध करण्यासाठी गावामध्ये अथवा परिसरामध्ये असे काही आढळल्यास नागरीकांनी पुढाकार घ्यावा. तसेच 1098 (चाईल्ड हेल्पलाईन),  जिल्हा महिला व  बाल विकास अधिकारी कार्यालय, बाल कल्याण समिती,जिल्हा बाल संरक्षण कक्ष  यांचेशी संपर्क साधावा.  तसेच  प्रत्येक गावात ग्राम बाल संरक्षण  समिती  कार्यान्वित करावे, असे आवाहन जिल्हा  महिला व बालविकास  अधिकारी यांनी केले आहे.

Previous Post

चाईल्ड हेल्पलाईनमुळे रोखला धामोरी येथील बालविवाह

Next Post

राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा शिष्यवृत्ती:जिल्ह्यातील २० खेळाडुंना लाभ

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
sport

राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा शिष्यवृत्ती:जिल्ह्यातील २० खेळाडुंना लाभ

राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले

राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.