• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

लॉकडाऊनमध्ये पूर्ण वेतन देण्याचा आदेश मागे

Media Desk by Media Desk
May 22, 2020
in Featured, कोविड १९, राज्य
Reading Time: 1 min read
78 1
0
सुप्रीम कोर्ट
14
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात कंपन्यांनी कर्मचार्‍यांना त्यांचे पूर्ण वेतन द्यावे, अशी सक्‍ती करणारा आदेश अखेर केंद्र सरकारने मागे घेतला आहे. यामुळे व्यावसायिक, उद्योजकांना मोठा दिलासा मिळू शकतो. लॉकडाऊनच्या काळात बंद राहणार्‍या कंपन्यांसाठीही हा आदेश लागू असणार नाही.

केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारपासून लागू झालेल्या चौथ्या लॉकडाऊनसाठी दिशानिर्देश जारी केले आहेत. यामध्ये लॉकडाऊनदरम्यान कर्मचार्‍यांना वेतन देणे बंधनकारक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कर्मचार्‍यांना लॉकडाऊन काळातील वेतन देणे बंधनकारक करण्याबाबतचा आदेश 29 मार्च 2020 रोजी जारी करण्यात आला होता. हा आदेश रद्द करण्यात आला आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

गृह मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, वेतन सक्‍तीसह नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटीद्वारा (एनईसी) जारी उर्वरित सर्व निर्देशांची 18 मे 2020 पासून अंमलबजावणी होणार नाही. नवीन दिशानिर्देशांमध्ये 29 मार्चच्या आदेशाचा समावेश नाही. त्यामुळे कंपन्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने 29 मार्च 2020 रोजी काढलेल्या आदेशात सर्व व्यावसायिक आणि उद्योगांना (दुकानदारांसह) आपल्या कर्मचार्‍यांचे निश्‍चित तारखेला वेतन देणे आणि लॉकडाऊनच्या काळातील वेतनात कपात न करण्याचे निर्देश दिले होते. नवीन आदेशात याचा उल्लेख नसल्यामुळे जुना आदेश आपोआपच रद्द झाला आहे. काही कंपन्यांनी शासनाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. गेल्या शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने शासनाच्या आदेशाला स्थगिती देताना कर्मचार्‍यांना वेतन देऊ न शकणार्‍या कंपन्यांविरुद्ध कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाने शासनाला आपल्या आदेशाचा पुनर्विचार करण्यास तसेच सात दिवसांत उत्तर देण्यासही सांगितले होते. नागरिका एक्स्पोर्टस् लिमिटेडने ही याचिका दाखल केली होती.

याचिकेत काय म्हटले होते?

लॉकडाऊनच्या काळात कंपन्यांमधील उत्पादन शून्य किंवा अत्यल्प असताना कर्मचार्‍यांना पूर्ण वेतन देण्यामुळे अधिकांश सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग बंद होतील आणि अनेक लोकांना कायम बेरोजगार राहावे लागेल. याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होईल. तसेच भविष्य निर्वाह निधीमध्ये (पीएफ) अशी मोठी रक्‍कम आहे, ज्याला कोणी दावेदार नाही. त्याशिवाय ईएसआयसीचीही मोठी रक्‍कम बँकांकडे जमा आहे. सरकार ही रक्‍कम कर्मचार्‍यांच्या मदतीसाठी वापरू शकते.

गृह मंत्रालयाचा आदेश काय होता?

लॉकडाऊनच्या काळात खासगी कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना पूर्ण वेतन दिले पाहिजे; अन्यथा त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पहिला लॉकडाऊन जाहीर करताना कर्मचार्‍यांना नोकरीवरून न काढण्याचे आणि पगारात कपात न करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर गृह मंत्रालयाने 29 मार्च 2020 रोजी आदेश जारी केला होता.

Tags: केंद्रीय गृह मंत्रालयलॉकडाऊन
Previous Post

आंतरराज्यीय प्रवासासाठी केंद्राचा ‘ई-पास’ सेवा उपक्रम

Next Post

पीक कर्जासाठी हमीपत्राची सक्ती नको-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे जिल्ह्यातील सर्व बॅंकांना निर्देश

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
district collector jitendra papalkar

पीक कर्जासाठी हमीपत्राची सक्ती नको-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे जिल्ह्यातील सर्व बॅंकांना निर्देश

liquor shop closed due to corona

बुलढाणा जिल्ह्यातील १५ दारूच्या दुकानांचे परवाने कायमस्वरूपी रद्द

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.