अडगाव बु (गणेश बुटे ): आज दि . ०६ / ०५ / २० रोजी अडगाव बु दुरक्षेत्र येथे पो . कॉ . २००१ / खंडारे यांच्यासह ओ . पी . येथे हजर असतांना सकाळी अंदाजे ०७ . ३० वा . गुप्तबातमीदाराकडून बातमी मिळाली की , धोंडाआखर गावाच्या लगत असलेल्या नाल्याच्या काठावरील वताच्या झाडाच्या खाली नंदलाल नारायण भिलावेकर हा इसम गावठी दारू गाळतो व अवैध रित्या दारूची विक्री करतो सध्या तो तेथेच गावठी दारूची भटटी लावून दारू गाळत आहे अशी विश्वसनिय खात्रीलायक बातमी मिळाली सदर बातमी मा . ठाणेदार सो . यांना देवून , मा . ठाणेदार सो . , यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अडगाव बु . बस स्टॅडजवळ दोन पंचाना बोलावून , त्यांना वरील प्रमाणे माहिती सांगून , प्रो रेड बाबत सविस्तर माहिती समजावून सांगीतली व आमचे सोबत रेडकामी पंच म्हणून सोबत चालण्यास विनंती केली . पंचानी सहमती दर्शविल्याने आम्ही स्वतः , पोलीस पथक व पंचनाम्यातील नमुद पंचासह खाजगी वाहनाने धोंडाआखर येथील शाळेजवळ जावून तेथे वाहने उभी करून खबर नुसार वळाच्या झाडाच्या दिशेने काही अंतर पायी लपत छपत जावून बहितले असता , वळाच्या झाडाखाली धुर निघतांना दिसला , त्या दिशेने जावून पाहणी केली असता , एक इसम दगडाच्या सहाय्याने केलेल्या चुलीवर पञ्याचे दोन पिपे ठेवून गावठी दारुची गाळण करीत असतांना दिसून आला .
सदर इसम हा गावठी दारू गाळत असल्याची आमची व पंचाची खात्री झाली . त्याला पोलीसांची चाहुल लागताच तो पोलीसांना पाहून जंगलाच्या दिशेने पळून गेला . आम्ही बटनास्थळावर जावून पाहणी केली असता , दगडाच्या चूलेवर दोन पञ्याचे टिपे लावून सळवा शिजवून त्या पासून दारू गाळण्याची प्रक्रिया चालू होती . सदर भट्टी आम्हीविजवून त्यावरील दोन पिप्यातील एकुण १२ लिटर सडवा मोहामाच किंमत अंदाजे १२०० / पंचासमक्ष घटनास्थळी नाश कला . तसेच त्या भट्टीच्या आजुबाजुला नाल्याच्या काठावर पाहणी केली असता , १५ पत्र्याचे टिपे , ०१ प्लॉस्टीक बॅरल , ०२ जर्मन डब्बे , ०१ स्टील कोठी इत्याची मध्ये अंदाजे १५० लिटर सड़वा मोहामाच व दोन पाच लिटर क्षमतेच्या प्लॉस्टीक कॅन , ज्यामध्ये गाळलेली १० लिटर गावठी दारू असा एकूण २२ , ००० / – रू . किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेतला . जप्त सळवा मोहामाच मधून एक १८० मि . ली . काचेच्या शिशीत सडवा मोहामाच काढून तसेच एक १८० मि . ली . काचेच्या शिशीत गाळलेली गावठी दारू सी . ए . परिक्षणाकरीता काढून असे दोन्ही नमुने त्यावर आमचे व पंचाचे सहीचे लेबल लावून मोक्यावर लाखेचे सिल करून राखून ठेवून जप्त अन्य मुद्देमाल घटनास्थळी पंचासमक्ष नाश करण्यात आला आहे . सदरचा रेड / जप्ती पंचनामा आम्ही सकाळी ०८ . ३५ वा . सुरू करून ०९ . ४० वा . संपविला . तरी फरार आरोपी नामे नंदलाल नारायण भिलावेकर , वय – २३ वर्षे , रा . धोंडाआखर , तेल्हारा , जि . अकोला याचे विरूध्द कलम ६५ ( ) ( क ) ( ड ) ( फ ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमा प्रमाणे होत असल्याने , त्याचे विरूध्द माझी कायदेशिर फिर्याद असून , गुन्हा दाखल होण्यास विनंती आहे