तेल्हारा (प्रतिनिधी)- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व सुरू असलेली संचार बंदी या मध्ये गरजूंनची होत असलेली हेडसांड लशात घेता महाराष्ट्र शासनाने तेल्हारा बस स्थानक जवळ शिवसेना पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थित शिवभोजन चा शुभारंभ केला असून ५ रुपयात येथे जेवण मिळणार आहे
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने जिल्हा पातळी पासून गाव पातळीवर अनेक ठिकाणी मजूर वर्ग व गरजूंनच्या जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी शिवभोजन सुरू करून पाच रूपया मध्ये जवणाची व्यवस्था केली या आधीच तेल्हारा येथे विश्रामगृहा जवळ शिवभोजन चा शुभारंभ झाला आहे त्यानंतर १ मे ला तेल्हारा बस स्थानक वर शिवभोजनचा शुभारंभ करण्यात आला आहे.या वेळी तहसीलदार राजेन्द्र सुरळकर , बिडीओ चव्हाण ,ठाणेदार विकास देवरे ,शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे ,जिल्हा परिषद सदस्य संजय अढाऊ ,उपतालुका प्रमुख अजय गावंडे , बाळासाहेब निमकर्डे , विठ्ठलराव जोशी सचिन थाटे , रामभाऊ फाटकर, ज्ञानेश्वर आखरे, सुधाकर हागे, राजेश अढाऊ बेलखेड, संजय लांडे,संजय कोरडे, संजय सोनोने सद्गुरू आकोटकार धनंजय पोटे गुरुदेव इसमोरे , सुमित गंभीरे, अंकुश बुरघाटे इत्यादी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.