अकोला– महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात त्यांना आज अभिवादन करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज सकाळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
महात्मा बसवेश्वर यांनी जातीभेद निर्मूलन व समानतेसाठी कार्य केले, त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे,असे उद्गार या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी खडसे यांनी काढले.
या प्रसंगी कार्यालयातील, निलेश दामोदर,आशिष काळे, प्रमोद ठाकूर आदी उपस्थित होते. या अभिवादन कार्यक्रमात सामाजिक अंतराचे पालन करण्यात आले.