अकोट (तालुका प्रतिनिधी शिवा मगर): दिनांक 24/ 04 /2020 रोजी पोलीस अधीक्षक अकोला यांचे विशेष पथक हे अवैध धंद्यावर कारवाई करण्याकरिता अकोला शहरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना त्यांची गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की पोलीस स्टेशन जुने शहर हद्दीतील महाकाली नगर सोनटक्के प्लॉट येथील अनिलकुमार चांडक यांचे राहते घराचे पहिल्या माळावरील घरात काही इसम हे 52 तास पत्त्यावर तीन पाणी परेल नावाच्या पैशा ची हार जीत चा खेड खेळीत आहेत. अशा मिळालेल्या गोपनीय माहितीवरून नमूद ठिकाणी जुगार रेट केला असता सदर ठिकाणी नंबर (1) शेख हुसेन उर्फ लखन शेख इब्राहिम वय 35 वर्ष राहणार चांद का प्लॉट हरिहर पेठ अकोला नंबर( 2 )अनिल कुमार गोवर्धनदास चांडक वय 55 वर्ष राहणार महाकाली नगर हरिहर पेठ अकोला नंबर( 3 )प्रवीण घनश्याम भोळे वय 47 वर्ष राहणार जठारपेठ अकोला असे मिळून आले घटनास्थळावरून आरोपी नामे शेख रियाज ताज मोहम्मद उर्फ बिडी
रा चांद का प्लॉट हरिहर पेठ अकोला हा दुसऱ्या मार्गाने पळून गेला आरोपी तपासातून तसेच आरोपी तपासातून एकूण नदी 62 हजार 400 रुपये विविध कंपन्यांचे एकूण 3 मोबाईल एकूण किंमत अंदाजे 25 हजार रुपये 52 पत्ते असा एकूण 87 हजार400 रुपये सामान जप्त करण्यात आले. असून पोलीस स्टेशन जुने शहर अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे यातील आरोपी क्रमांक( 3) प्रवीण घनश्याम भोळे हे पोलीस स्टेशन अकोट फाइल येथे नाईक पोलीस शिपाई या पदावर नेमणुकीस असून त्यांचे गैर वर्तणूकीबाबत त्यांच्याविरुद्ध खातेनिहाय कारवाई करण्यात येत आहे.
अधिक वाचा: पातूर येथे कोरोना पथकाची गुडलक स्वीट अँड जनरल वर कारवाई.