पातूर (प्रतिनिधी सुनिल गाडगे):- जिल्हा अधिकारयांनी दिलेल्या आदेशाचे उल्लघण करणाऱ्या गूडलक स्वीट अँड जनरल विरूद्ध कोरोना पथकांने २४ एप्रिल रोजी दंडात्मक कारवाई केली. तसेच तीन ग्रामस्थांना तोंडाला मास्क न बांधल्या मुळे दंड केला.ही कारवाई ग्रामपंचायत आणि पोलिस प्रशासन केली.
कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध आदेश जारी केले आहेत. यामध्ये दुकानान सकाळी 8 ते 12 या वेळेतच सूट आहे. नियोजित वेळेनंतरही दुकान सुरू ठेवणाऱ्या गुडलक स्वीट अँड जनरल च्या मालकास दोन हजार रुपये दंड ठोठवण्यात आला. तसेच तोंडाला मास्क न बसणाऱ्या लोकांना प्रत्येकी दोनशे रुपये या प्रमाणे सहाशे रुपये दंड करण्यात आला आहे. ही कारवाही पोलिस उपनिरीक्षक गोरे साहेब व ग्रामविकास अधिकारी राहुल उंदरे साहेब, सहायक ग्रामसेवक अक्षय गाडगे, ग्रामपंचायत कर्मचारी प्रमोद उगले,अंबादास इंगळे,चंद्रकांत धोटकर,गृहरक्षक दलाचे जवान उमेश उंबरकर, शुभम काळपांडे, सहदेव काळपांडे आदींनी केली.
अधिक वाचा: बॅंका, वित्तीय संस्थांच्या वेळेत आजपासून बदल