तेल्हारा- स्थानीय तेल्हारा येथे शिव जयंती निमित्त शहरातून निघालेल्या शोभा यात्रेचे मुख्य मार्ग कादरी किराणा येथे तेल्हारा शहरातील शाह समाज, सुलतान ग्रुप च्या वतीने शोभा यात्रेच्या पदाधिकारी यांचे पुष्पहाराणे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने शाह समाजचे नेते नगरसेवक गणी शाह सर, माजी नगरसेवक चांद शाह, सलीम शाह पहेलवान, राजीक शाह ,अमीन शाह, शिव सेनेचे पदाधिकारी रहेमान शाह, समाज नेते इरफान शाह दादा, बाबा नूर शाह यांनी शोभा यात्रेचे अध्यक्ष रोशन पाटील अहेरकर, सचिन तायडे, भय्या खारोडे सहित इतर पदाधिकारी यांचं स्वागत केले.
यावेळी रेहान शाह, मन्ना शाह कादरी, इर्शाद शाह कादरी, समीर शाह, दिलशाद शाह, बबलू शाह मिस्त्री, लुकमान शाह, एजाज शाह, अस्लम शाह, शहेबाज शाह, रफिक शाह, शहेबाज शाह बिल्डर, साजिद शाह, मुक्तार शाह, राजा कुरेशी, साबीर शाह, दिलशाद शाह सहित शाह समाजचे कार्यकर्ते उपस्थित होते.