वरुड बुद्रुक(श्रीकृष्ण वायकर)– येथे बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी 2020 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची 390 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची धनंजय खोडके यांच्या हस्ते दुधाने आंघोळ घालण्यात आली. त्यानंतर उपसरपंच दत्तात्रय बिहाडे व मान्यवर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन व हारअर्पण करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेत शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्रीकृष्ण वायकर व मुख्याध्यापक शांताराम राऊत, केंद्रप्रमुख साबळे सर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यालयात सरपंचा सौ उज्वला ताई विश्वासराव दुतंडे व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हारअपर्ण करण्यात आले. तसेच स्वं.नारायणराव बिहाडे विद्यालयात शिकक अशोक दळवी व शिक्षकवृंद यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व हारअपर्ण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन एकनाथ बाहकर तर आभार प्रदर्शन सचिव अनिल खुमकर यांनी मानलेत. सदर कार्यक्रमाकरीता सेवा.सह, सोसायटी संचालक पंजाबराव बिहाडे, शंकरराव ताथोड, विश्वासराव दुतंडे, आशा सेविका चिञाताई दुतंडे, नागोराव धुर्वे, कीसन खडे, रामकृष्ण भांबुरकर,चरणदास खेडकर, पंजाबराव दुतंडे, मारोती बावस्कार ग्रामपंचायत ऑपरेटर मुकेश बिहाडे, ग्रामरोजगार सेवक श्रीकृष्ण वायकर,शिपाई सदानंद दळवी, गावातील नागरीक व विद्यार्थी उपस्थित होते.