तेल्हारा(प्रतीनिधी)- तेल्हारा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मध्ये जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तेल्हारा व अकोट यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवात सर्व प्रथम दिपप्रजोलन करून करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवर तसेच युवक व युवतीच्या स्वागतार्ह संस्थेतील प्रशिक्षणार्थी धनश्री जायले हिने स्वागत गीत सादर केले. या कार्यक्रमाला अध्यक्ष आर. टी मुळे प्राचार्य औ. प्र. संस्था तेल्हारा तर प्रमुख पाहुणे सुधाकर झळके सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला व प्राचार्य प्रकाश खुळे औ. प्र. संस्था अकोट, यांची उपस्थिती होती. यावेळी सहाय्यक आयुक्त सुधाकर झळके यांनी उपस्थित युवक युवतींना मागदर्शन करतांना जिल्हा कौशल्य विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.
त्याच बरोबर स्वयं रोजगाराकडे तरुणांनी कल वाढवावा व कौशल्यवान तरुण ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन प्राचार्य खुळे साहेब यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये उपस्थित युवक युवतींनी जास्तीत जास्त प्रमाणात या रोजगार मेळावाच्या माध्यमातून आलेल्या संधीच सोनं करावे असे आव्हाहन प्राचार्य आर. टी. मुळे यांनी अध्यक्षीय भाषाणामध्ये केले .
या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील नामवंत कपन्यांनी सहभाग घेतला त्यामध्ये धूत ट्रान्समिशन, खंडेलवाल ऑटोव्हिल प्रा. लि., भारतीय जीवन निगम, भारत आर. एच., ह्या कंपनीच्या माध्यमातून १९४ विविध पदांकरिता मुलाखती घेण्यात आल्यात. या रोजगार मेळाव्यात २११ युवक युवतींनी सहभाग नोंदविला होता.या रोजगार मेळाव्याला वरील कंपनी द्वारे शुभम पाटिल, जैनसर, सुमित भगत, रोहित महाजन, अक्षय शाह, गोविद वाघमारे, रोहित परस्कार, अजय चव्हाण, हे प्रतिनिधीकडून मुलाखती घेण्यात आल्या. या रोजगार मेळाव्यात सहभागी १५० निवड करण्यात आली आहे. या रोजगार मेळाव्याला संस्थेतील जी एन शिंगोकार, जी. के. चिंचोळकर, आर. एन. घावट, एस के बुरकुल, एस आर. डाखोडे, ए. डी. जैन, एस एस गुजर, जी एस राऊत, कुंमखिले, सौ . पांडव, सौ श्रीखंडे, गावंडे , जाधव, एन व्ही देशपांडे, सौ सोनाली मॅडम, अजय चव्हाण, महेंद्र मेश्राम, एन एम पोफळी, यांची उपस्थिती होती. त्याच बरोबर तेल्हारा तालुक्यातील शेकडो युवक व युवतींनी या रोजगार मेळाव्या मध्ये सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे संचालन सचिन थाटे यांनी केले होते .
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/JCHDKTxXxij4HRgrZwmzu8