तेल्हारा (प्रतिनिधी)- श्रीराम नवमी शोभा यात्रा उत्सव समितीद्वारा आज दिनांक 26 जानेवारी 2020 रोजी तालुका क्रीडा संकुल तेल्हारा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
श्रीराम नवमी उत्सव समिती द्वारे नेहमीच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.तेल्हारा तालुक्यातील क्रीडा प्रेमी युवक व युवतीच्या क्रीडा क्षेत्रात उत्साह वाढवा याकरिता तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम भव्य तिरंगा रॅली काढून करण्यात आली या तिरंगा रॅली मध्ये तेल्हारा शहरातील आजी माजी सैनिक रॅली चे मुख्य आकर्षण होते. डॉ बाबा साहेब आंबेडकर उद्यान येथून सर्व महापुरुषांना हारापर्ण करून रॅली सुरवात झाली. जगतगुरु संत तुकाराम महाराज चौक, ते टॉवर चौक ते क्रीडा संकुल पर्यंत रॅली काढण्यात आली होती .टाॅवर चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतड्याचे पूजन व हारापर्ण करण्यात आले .
या कार्यक्रमाचे उद्घाटन तेल्हारा तहसीलदार श्री आ. यु सुरळकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली विकास देवरे ठाणेदार तेल्हारा यांनी केले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार सुरळकर साहेब, डाॅ. संजीवनीताई बिहाडे, संजय अढाऊ,महादेवराव ठाकरे, नरेश आप्पा गंभीरे, प्रकाशराव वाकोडे, अरविद तिव्हाणे, किरण अवताडे, मंगेश सोळंके, विक्की मल्ल, व ओमसुईवाल, गोवर्धन पोहरकार,सोनू मालिये,रवी पडिया प्रा. कोरपे, आदीमान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
तेल्हारा शहरातील भारतीय सेने मध्ये सेवा देणारे राम घंगाळ, राम पाऊलझगडे सुशोध गायगोळ, राहुल आरसुले, पंकज कांगटे, सागर निर्मळ, अक्षय आरसुले, प्रकाश सोनवणे, जबिर पठाण, या जवानांचा सत्कार यावेळी समितीच्या वतीने करण्यात आला. त्याच बरोबर तेल्हारा तालुका क्रीडा संकुल येथे क्रीडा संकुलवर क्रीडा प्रेमींना साहाय्य करणारे राम घंगाळ व राम पाऊलझगडे याचा सत्कार समितीच्या वतीने करण्यात आला. दिवसभर विविध स्पर्धांचे रंगतदार सामने क्रीडा संकुल वर रंगले होते.
यास्पर्धेमध्ये गोळाफेक मुलींमधून प्रथम क्रमांक पूजा पात्रीकर व व्दितीय क्रमांक श्रद्धा गजानन अवचार, 100 मीटर मुलींमध्ये प्रथम क्रमांक छाया वानखडे दुसरा क्रमांक शितल हागे, हिने पटकावला त्यानंतर गोळा फेक मुले प्रथम क्रमांक मयुर मलीये द्वितीय क्रमांक सुरज भोजने, 400 मीटर रनिंग प्रथम क्रमांक प्रथमेश तारमेकवार द्वितीय क्रमांक अमित दामोदर, लांब उडी मुले प्रथम क्रमांक अर्जुन रसाळ द्वितीय क्रमांक उमेश सहारे,लांब उडी मुली प्रथम क्रमांक पूजा जयस्वाल द्वितीय क्रमांक गायत्री धनभर, 1600 मीटर धावणे मुले प्रथम क्रमांक हर्षल अवचार, द्वितीय क्रमांक प्रफुल खोडे, व प्रोत्साहनपर करण पवार, यासर्वं विजयी स्पर्धकांना मा. गोपालदासजी मल्ल, सौ. मालूताई खाडे, सौ. नलिनीताई तायडे, सौ आरतीताई गायकवाड, सौ. सीमाताई पिवाल, सुनील राठोड, जितेंद्र चांडक, पवार गुरुजी, श्रीकृष्ण ठाकरे, मनोहर चितलंगे, पुरुषोत्तम जायले, घंगाळ सर, पाऊलझगडे, गायगोळ सर,झामरेसर,अतुल वानखडे, सचिन तायडे मान्यवरांचे हस्ते स्मृति चिन्ह व रोख बक्षीस देवुन गौरवण्यात आले.
यामधील फुटबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण उद्या सकाळी 11 वाजता अंतिम सामना होणार आहे, या कार्यक्रमाला तेल्हारा तालुक्यातील हजारो युवक व युवती उपस्थित होते, या कार्यक्रमा करीता श्रीराम नवमी उत्सव समिती चे सर्व सदस्य व लक्ष अकॅडमी, जयहो अकॅडमी, ब्लुफायर टीम, व तेल्हारा शहरातील सर्व मंडळे यांनी सहकार्य केले. समारोपा नंतर श्रीराम नवमी शोभा समीतीचे सर्व सदयस व खेळाडू यांनी जल्लोष केला.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/JCHDKTxXxij4HRgrZwmzu8