तेल्हारा( निलेश जवकार)- तेल्हारा तालुक्यातील नावाजलेली शैक्षणिक संस्था सेठ बन्सीधर विद्यालयात सेठ बन्सीधर झुनझुनवाला यांच्या जयंती व स्नेहमीलनच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला स्वामी विवेकानंद ज्ञानपीठात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
सेठ बन्सीधर विद्यालय ज्यांच्या नावे आहे असे सेठ बन्सीधर झुनझुनवाला यांची जयंती यावर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून त्या निमित्य शालेय स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.आज दि १० जानेवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमला सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम विद्येचे देवता सरस्वती माता, स्वामी विवेकानंद, सेठ बन्सीधर झुनझुनवाला यांच्या प्रतिमेचे पूजन सेठ बन्सीधर विद्यालयाचे अध्यक्ष बेणीप्रसाद झुनझुनवाला, उपाध्यक्ष विलास जोशी, कोषाध्यक्ष विठ्ठल खारोडे, व्यवस्थापक गोपालसेठ मल्ल, संचालक विष्णू मल्ल, डॉ विक्रम जोशी, सौ अस्विनी खारोडे, पालक प्रतिनिधी विजयसिंह बलोदे, सौ मोनिका तराळे यांनी पूजन केले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी चिमुकल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन उपस्थित पालकवर्गाचे मन जिंकले. यावेळी सूत्रसंचालन ज्ञानपीठाच्या विद्यार्थिनी केले.