तेल्हारा(प्रतिनिधी)- सेठ बन्सीधर विद्यालयाचे जनक ज्याच्या नावे शैक्षणिक संस्था आहे असे स्व सेठ बन्सीधर झुनझुनवाला यांच्या जयंती निमित्य उद्या दिनांक १२ जानेवारी रोजी भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन सेठ बन्सीधर दहिगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटी तेल्हारा तर्फे करण्यात आले आहे.
उद्या दिनांक १२ जानेवारी रोजी स्थानिक सेठ बन्सीधर विद्यालयात दुपारी ११ ते २ यावेळेत स्व सेठ बन्सीधर झुनझुनवाला जयंती उत्सवानिमित्य भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले असून या आरोग्य शिबिरामध्ये नामवंत डॉक्टर कडून मोफत तपासणी करून औषध उपचार करण्यात येणार आहेत.यामध्ये डॉ अभिजित लउळ हाडाचे मणक्याचे तज्ञ,डॉ विवेक खपली नेत्र रोग व मोतीबिंदू तज्ञ,डॉ अश्विन आयदासनी दंतरोग व मुखरोग तज्ञ,डॉ अजय दावर मधुमेह व हृदय रोग तज्ञ या डॉक्टरांकडून तपासणी करून औषध उपचार करण्यात येणार आहेत.तरी या संधीचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.