अकोला(दीपक गवई)- चर्मकार समाजातील उपवर वधूवरांचा परिचय मेळावा दरवर्षीप्रमाणे यंदाही अकोला चर्मकार फोर प्लस ग्रुपच्या वतीने अकोला येथेआयोजित करण्यात येत आहे. या वर्षीच्या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे की यावर्षी समाजातील गरीब कुटुंबातील एका जोडप्याचे लग्न मेळाव्यात लावण्याचा व रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा मानस आहे.
जानेवारी २०२० च्या प्रारंभी चर्मकार समाजातील उपवर- वधु परिचय मेळावा आयोजित करण्यात येत आहे.सदर मेळाव्यात सहभागी होणाऱ्या वधुवरांना निशुल्क प्रवेशआहे. नोंदणी करून परिचय मेळाव्यात प्रत्यक्ष परिचय देणा-या उपवर-वधु यांस बहुरंगी सोयर पुस्तिका विनामूल्य देण्यात येणार आहे. १५ डिसेंबर पर्यंत नाव नोंदणी करता येईल. सोबत उपवर/वधु चा रंगीत फोटो अर्जासोबत देणे बंधनकारक आहे. चर्मकार समाजातील कुठल्याही जाती-पोट जातीतील वधुवर यांनी मेळाव्या करीता परिचय पत्र खालील परिचय पत्र संकलन केंद्रावरून उपलब्ध करावी.
विश्वनाथ ठोंबरे दिनेश शु सेंटर जवाहर नगर चौक,मधुसूदन गव्हाळे नवीन सुभेदार नागरी सहकारी पतसंस्था डाबकी रोड, राजेंद्र सावळे आधार बॅग हाऊस गोरक्षण रोड, नंदकिशोर ढाकरे विदर्भ मोटर ड्राईविंग स्कूल रणपिसे नगर अकोला, असे आवाहन नरेंद्र चिमणकर यांनी केले आहे.