मांडोली बाळापुर (प्रतिनिधी)- शहीद जवानांना श्रद्धाजंली व संविधान दिनांचा कार्यक्रम बाळापुर तालुक्यातील मांडोली येथे म. पु. मा. शाळेमध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपति शाहूजी बहुउद्देशीय संस्था मार्फत करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून व मा. ऑड डी. टी. जंजाळ सर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक अ.पा. राऊत सर उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे ऑड डी.टी. जंजाळ सर यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी विद्यार्थ्यांना फळ व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. व संविधानाची शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन मा. गोपाल नागलकर सर यांनी केले.
आभार छत्रपति शाहूजी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मा. आनंदराव वानखड़े यांनी मानले यावेळी संस्थेचे सल्लागार मा. गणेश गव्हाळे सर प्रमुख उपस्थिति होते.तसेच गोपाल होनाळे सरपंच, डोंगरे मैडम ग्रामपंचायत सचिव, मालूताई इंगळे आंगनवाड़ी सेविका, शबाना पठाण, दिनकर वानखडे तंटामुक्ती अध्यक्ष, मोहन वानखडे ग्रामपंचायत सदस्य, ऑड एस.एस. सुरवाड़े, शुद्धोधन वानखडे संस्थेचे सचिव, मनोज हातेकर, राजेश इंगळे मोटू वानखडे, मुन्ना वानखडे, राहुल होनाळे उदेभान वानखडे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्विरीतेसाठी संस्थेच्या सर्व सदस्यांनी व गावक-यांनी प्रयत्न केले.यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्यांनी उपस्थित होते.