• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, May 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

बुलढाणा जिल्ह्यातील हिंदू – मुस्लिम ऐक्याचं प्रतीक गाव जयपूर

adil by adil
May 12, 2020
in Featured, अकोला जिल्हा, फिचर्ड
Reading Time: 1 min read
78 1
0
बुलढाणा
11
SHARES
565
VIEWS
FBWhatsappTelegram

विदर्भ दर्शन – बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील जयपूर हे गाव हिंदू – मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानलं जातं. या गावात मंदिर आणि मशीद एकाच ठिकाणी आहेत, अगदी भिंतीला भिंत लागून आहेत, तरीही आजवर इथे कधी सामाजिक दंगल किंवा धार्मिक तनाव निर्माण झाला नाही. सर्व हिंदू आणि मुस्लिम मिळून मिसळून राहतात.

मोताळा तालुक्यापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या जयपूर गावात हनुमान मंदिर आणि मशीद एकाच ठिकाणी आहेत. एकीकडे मशीदीत अजान – नमाज अदा केली जाते तर दूसरीकडे मंदिरात घंटांच्या नादात बजरंग बलीचा जयघोष चालू असतो. भक्तीचा मार्ग जरी वेगवेगळा असला तरी सर्वांची श्रद्धा एक आहे.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

मंदिर आणि मशीद जवळ एक वटा बांधलेला आहे, जिथे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे लोक एकत्र बसून विचारांची देवाणघेवाण करतात. हिंदू आणि मुस्लिम एकमेकांच्या लग्न कार्यात सहभागी होतात. दसरा – दिवाळीला मुस्लिम लोक हिंदूना आलिंगन देऊन शुभेच्छा देतात, हिंदू लोक त्यांना फराळाला घरी नेतात. याचप्रमाणे ईद साजरी केली जाते. हिंदू बांधव मुस्लिम बांधवांना ईद मुबारक देतात, मुस्लिम बांधव ही हिंदूना शिरखुर्म्यासाठी आमंत्रित करतात. सर्व मिळून सण उत्सव साजरे करतात आणि एकमेकांच्या सुख दुखात सहभागी होतात.

ज्यावेळी देशात हिंदू – मुस्लिम आणि मंदिर – मशीद यावरुन दंगल आणि धार्मिक तनाव निर्माण होतो त्यावेळी जयपूर गाव आपली एकता आणि अखंडता टिकवून असते. समाजातील काही विकृत लोक दोन गटात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात त्यांनी जयपूर गावाकडून शिकवण घ्यावी.

ज्याप्रमाणे जयपूर गावाने हिंदू मुस्लिम एकता आणि धार्मिक सद्भावना टिकवून ठेवली आहे, त्याचप्रमाणे संपूर्ण देशात सामाजिक एकता आणि प्रेम राखून ठेवण्याची गरज आज देशाला आहे.

Tags: बुलढाणा
Previous Post

अयोध्येतील वादग्रस्त जागी राम मंदिर उभारा: SC

Next Post

मतदार साक्षरता जनजागृतीसाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल श्रीकांत तळोकार यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
अकोला

मतदार साक्षरता जनजागृतीसाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल श्रीकांत तळोकार यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार

अकोट

अकोट येथील गाझी प्लाट येथे ईद मिलाद चा कार्यक्रम शांततेत पार पडला

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.