तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा शहरातील हॉली अँजेल स्कूल येथे गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धेत भाग घेऊन महात्मा गांधी सर्वांसमोर मांडले. यावेळी शाळेच्या वतीने विविध स्पर्धा आयोजित करून त्यामध्ये विद्यार्थ्यांनि सहभाग नोंदवला होता.आयोजित कार्यक्रमात गांधीजींची वेशभूषा या स्पर्धेत जय जवंजाळ या विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक पटकावला तर बुरा मत बोलो बुरा मत देखो बुरा मत सुनो हे सांगणाऱ्या तीन माकडांच्या भूमिकेतील स्पर्धेत प्रेम दामोदर,आयुषी देशमुख,सात्विक खारोडे, आशीर्वाद आखरे यांनी क्रमांक पटकावला. महात्मा गांधींचे चरित्र या विषयावर नाटकात सुपेश जवजाळ, शिवराज बिहाडे, आयुषी देशमुख, तेहरीम, प्रेम दामोदर यांनी क्रमांक पटकावला. गितगायन आयुषी देशमुख तर गांधी जीवनावरील भाषनात हर्षल वानखडे, चेतना राठी, तेजस्वनी बोदडे, अयाण मोहम्मद, सिद्धी राठी यांनी क्रमांक पटकावला. तर महात्मा गांधी यांचे चक्राचे मॉडेल सर्वेश भटकर या विद्यार्थ्यांने सुबक असे बनवून क्रमांक पटकावला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मिटकरी तर आभार प्रदर्शन शिक्षिका भट्टड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका रजनी आखरे यांच्या सह शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.