दानापूर (सुनिलकुमार धुरडे)- मी जीवनातील मित्र व माझा भाऊ गमावला ज्याने मैत्री व भाऊ यांच्यात कोणताही दुजा भाव न ठेवता आपली मैत्री जपत गेला असा मित्र मी गमावला असे भावूक उदगार संजय आठवले यांनी काढले. दानापूर प्रेस क्लब याच्यां वतीने जिल्हा परिषद शाळेत आयोजित स्व. संजयकुमार वानखडे संस्थपक अध्यक्ष प्रेस क्लब याच्यां प्रथम पुण्यसमरण निमित्त घेण्यात आलेल्या भव्य रोगनिदान व दन्त चिकित्सा निशुल्क औषधोपचार कार्यक्रम शिबिरात ते बोलत होते. ते पुढे हे ही म्हणाले की माणसाने जिवंत पणी काय केले त्या पेक्षा त्याने केलेले कार्य किती महत्वाचे आहे. यावर माणसाची किंमत ठरते असे बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. संजयकुमार वानखडे याच्यां प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे उद्धघटक तेल्हारा प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रल्हाद ढोकणे, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रेस क्लबचे संजय हागे हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये सरपंच सौ. अनुराधा गोयनका, सत्य साई सेवा संघटनेचे डॉ. राधकीसन अटल, डॉ. राजाराम खोडे, तेल्हारा प्रेस क्लबचे सुरेश शिंगणारे, हिवरखेड प्रेस क्लबचे श्यामशील भोपळे, अकोट प्रेस क्लबचे संजय आठवले, प्रशांत विखे, अनंत अहेरकर , सत्यशील सावरकर,सदानंद खारोडे, राहुल मिटकरी यांची उपस्थिती होती.
या शिबिरात गावातील 813 लोकांनी आरोग्य तपासणी केली करून निशुल्क औषधोपचार करण्यात आला.त्याच बरोबर एकता गृप च्या वतीने रक्तदान शिबीर प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आले यावेळी 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमाला वानखडे कुटूंब , गावातील प्रतिष्ठित, नागरिक, मेडिकल संघटना, छावा संघटना, जगदंबा मित्र मंडळ, स्टडी ग्रुप व मित्र मंडळ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश खोडे यांनी केले तर आभार प्रेस क्लबचे सुनिलकुमार धुरडे यांनी मानले.