निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनील अरोरा मंगळवारी दि १७ सप्टेंबर १९ रोजी मुंबईत येत असून, त्यांच्या उपस्थितीत बुधवारी होणार्या बैठकीनंतर शुक्रवारी अथवा शनिवारी निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.
अरोरा यांच्यासह निवडणूक आयुक्त अशोक लवासा, सुशील चंद्रा, आयोगाचे चार उपनिवडणूक आयुक्त आणि महासंचालक मंगळवारी संध्याकाळी मुंबईत येणार आहेत. बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात होणार्या बैठकीत संवेदनशील मतदान केंद्रांसह राज्याच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे सर्व जिल्हाधिकारी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना या बैठकीस बोलवण्यात आले आहे.
अधिक वाचा: महाराष्ट्रातील पहिल्या विधानसभेच्या निवडणुक महासंग्रामचा मागोवा
भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, शिवसेना, मनसे या पक्षांंच्या प्रतिनिधींनाही बैठकीचे निमंत्रण आहे. या बैठकीनंतर शुक्रवारी अथवा शनिवारी निवडणुकीची घोषणा होऊ शकते.
very fast news