अडगांव बु. (दिपक रेळे)- सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या एदलापुर गावातील हस्ताक्षर तज्ञ तथा सुक्ष्म हस्तलिखित विनायक धान्डे हे अत्यंत गरिब कुटुंबातील व्यक्ती असुन त्यांना सुंदर हस्ताक्षराची त्यांना आवड आहे त्यांनी मजुरी करुन स्वतःच्या स्वखर्चाने अमरावती विभागातील 700 च्या वर शाळेत जाऊन शालेय सुंदर हस्ताक्षर प्रकल्प राबविला व विद्यार्थ्यांना निशुल्क मार्गदर्शन केले. त्यांच्या कलेला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व डॉ. अब्दुल कलाम यांनी त्यांची हस्त कला पाहुन त्यांचे स्वागत केले होते.
माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या कल्पनेतून विनायक धान्डे यांनी उभारली अनाथ बालकां साठी आश्रय ध्यान फाऊंडेशन जिल्ह्य़ातील तमाम अनाथ बालक, रस्त्यावर भटकणारी मुले शिक्षण बाह्य गरीब निराश्रित आणि निराधार यांचे साठी दयनीय अवस्थेत जिवन कंठत असणारी मुले ही अगदी कोवळ्या वयात असतात. त्या वयात त्याच्यावर चिंता, काळजी आणि ताण तणावामुळे अश्या परिस्थितीत त्यांचे मनावर भितीचा पगडा बसतो. त्यांचे मनमानी निर्णय चुकीचे निर्णय असे कितीतरी गोष्टींचा विपरीत परिणाम भावी जिवनात निर्माण होऊ शकतो. म्हणुनच त्यांना अलगत यातुन मुक्त होण्यासाठी अनाथ निराधार यांचे साठी ध्यान साधना शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीरामधे अनाथ मुलांना कपडे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. संध्याताई वाघोडे, हिवरखेड पोलीस स्टेशनचे पि. एस. आय. गवई, राऊत, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रा. प सदस्य तसेच गावातील महिला पुरुष उपस्थित होते. तसेच आश्रय ध्यान फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष विनायक धान्डे यांनी मार्गदर्शन केले.