अकोला (प्रतिनिधी)- प्रभाग क्रमांक १२ व १३ मधील नेहरू पार्क ते सिव्हिल लाईन सिमेंट रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम जिल्ह्याचे पालकमंत्री अकोलाविकास सम्राट ना.डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते पार पडला. नेहरू पार्क – सिव्हिल लाईन-दुर्गा चौक- बिर्ला गेट या रस्त्यकरिता त्यांचा खात्याचा(नगरविकास) विषेश निधी १८ कोटी रुपये मंजूर करून दिले. अकोला शहराची नाळ असलेला हा नेकलेस रोड अकोला शहराला एक नवीन रूप देणार आहे असे त्यांनी त्यांचा भाषणा मधून व्यक्त केले. यावेळी अध्यक्षस्थानी ना. डॉ. रणजीत पाटील , डॉ. अशोक ओलंबे, नगरसेवक आशिष पवित्रकार , हरिशभाई अलिमचंदानी, गिरीश गोखले, गवाणकर साहेब , खोटरे साहेब,दीपक माई, डॉ संजय धोत्रे, संजय चौधरी, किशोर मानकर,श्रीकांत एखांडे, संजय तिकांडे, जीवनराव देशमुख, जेष्ठ नागरिक सारडा जी , अमर सावजी, लताताई गावंडे, सोनालताई ठक्कर,पवन सुर्वे, आकाश डोंगरे,अश्विन लोहिया, आशुतोष काटे,अमोल पयघान,शिवा मानकर,अतुल पिलात्रे आणी प्रभगातिल नागरिक कार्यक्रमास उपस्थित होते.