अकोला(प्रतिनिधी)- अद्यापही समाजाची मानसिकता बदलली नसून मुलगी झाली तर तिला एकतर पोटातच मारून टाकायचे नाहीतर जन्मानंतर अशीच एक घटना आज अकोल्यात घडली एका स्त्री जातीचे अभ्रक एका नाल्यात फेकून निर्दयतेचा कळस गाठला.
शहरातील स्थानिक बिर्ला गेट न २ बागडी भवन च्या समोरील सांडपाण्याच्या नाल्यात एक स्त्री जातीचे अभ्रक अनोळखी व्यक्तीने फेकून निर्दयतेचा कळस गाठला.सदर अभ्रक हे मृतावस्थेत सापडले असून रामदास पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अभ्रकाला बाहेर काढून ताब्यात घेतले.सदर अभ्रक कोणी फेकले याचा तपास रामदास पेठ पोलीस करणार आहेत.