अडगांव (दीपक रेळे)- गावशिवारात 50 दिवस दर्जेदार व प्रमणिकपणे केलेल्या कामामुळे अडगांव ब.ला. प्रथम क्रमांक मिळाला असून. हा संपुर्ण गावकय्रांचा सन्मान आहे, असे मत तालुका समन्ययक अनिकेत लिखार यांनी व्यक्त केले. गावकय्रांच्यावतीने आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. अडगाव बु. ला पुणे येथे फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2019 मध्ये तालुका स्तरावरील प्रथम क्रमांकाने सन्मनित करण्यात आले. अडगांव बु. पाणी फाउंडेशनची टीम गावात पोहोचताच फटाक्यांची आतषबाजी करीत गावकय्रानी जल्लोषात स्वागत करुन वाजत गाजत गावातून मिरवणूक काढली. त्यानंतर सरपंच रुक्मिणी मंगलसिंग डाबेराव यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या सत्कार सोहळ्यात सोसायटी अध्यक्ष मनोहरलाल फाफट, दिपक बोडखे, . तालुका समन्ययक अनिकेत लिखार ,अंबादास खडसान, पत्रकार टीम, पाणी फाउंडेशनची टीम प्रमुख उपस्थिती होती.
अधिक वाचा : अकोट ग्रामीण रुग्णालयाच्या मागे जनावरांच्या मासाचे पोते आढळले
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola