अकोट( देवानंद खिरकर): अकोट तालुक्यातील कुटासा व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कुटासा परिसरात रिमझिम पाऊस सुरु होता. परंतु गेल्या दोन दिवसांपासून अचानक पावसाने जोर धरला असून गेल्या ३६ तासापासून या परिसरात संततधार सुरू होती . त्यामुळे येथील अन्नपूर्णा शंकरराव भगत यांच्या घराची पडझड झाली आहे मात्र शासनाचा कुठलाही अधीकारी आतापर्यंत ही हे पाहण्यासाठी आलेला नाही व त्यांच्या घराचा कुठल्याही प्रकारे पंचनामा केलेला नाही .
प्रतिक्रिया .. अन्नपुर्णा शंकरराव भगत .. कुटासा
संतत मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे माझ्या घराच्या दोन्ही भिंती कोसळल्या आहेत
अन्नपूर्णा शंकरराव भगत यांच्या घराची पडझड झाली असून आजुबाजुला असलेल्या घराच्या दोन्ही भिंता पाऊसामुळे पडल्या आहेत मात्र यांचा पंचनामा करण्यासाठी शासनाचा कुठलाही अधीकारी आतापर्यंत आलेला नाही शासनाच्या आधीकार्याने पंचनामा करुन यांची नुकसान भरपाई देण्यात यावी.