अकोट(प्रतिनिधी)- तरुणांना योग्य प्रशिक्षण मिळण्यासाठी माजी सैनिकांनी आपल्या अनुभवातून त्यांना देशसेवेचे धडे देत, मायभूमीच्या सेवेसाठी प्रेरित करावे, यासाठी लोकजागर मंच सदैव आपल्या सोबत आहे. असे प्रतिपादन लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष मा.अनिल गावंडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून केले.
स्थानिक हिवरखेड येथील लोकजागर मंच व जगतगुरू प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित फौजी सुनील निंबोकार यांच्या सेवानिवृत्तीच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.सदर कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली, यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष मा. अनिल गावंडे हे होते, तर सत्कारमूर्ती फौजी सुनील निंबोकार व गोपाल भोंगाळे तसेच पोलीस पाटील प्रकाश गावंडे, माजी सरपंच सुरेश ओंकारे, संदीप इंगळे, माजी पंचायत समिती सदस्य रमेश दुतोंडे व परिसरातील आजी-माजी सैनिकांची विचारपिठावर प्रमुख उपस्थिती होती.
फौजी सुनील निंबोकार हे BSF मध्ये हवालदार या पदावर मातृभूमीच्या सेवा करून सेवानिवृत्त होत आपल्या जन्मभूमीत परतले, यावेळी स्वातंत्र्य संग्राम सैनिक स्व. संपतराव भोपळे चौक पासून मेन रोडने जगतगुरू संत तुकाराम महाराज चौकपर्यंत ढोल ताशांच्या गजरात भव्य रॅलीचे आयोजन करून सेवानिवृत्त फौजी सुनील निंबोकार यांचे स्वागत करण्यात आले, प्रसंगी विविध संघटनांद्वारेही त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी कुटुंबापासून दूर राहून देशाची सेवा करण्यात एक मोठा त्याग असतो आणि याची जाणीव सर्वांमध्ये असावी, असे सत्कारमूर्ती फौजी सुनील निंबोकार यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. यावेळी तुषार देशमुख, सलमान खान, भाऊ काईंगे, विशाल दाते यांनी आपल्या मनोगतातून सुनील निंबोकार यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन लोकजागर मंच हिवरखेडचे अध्यक्ष महेंद्र कराळे यांनी केले तर प्रास्ताविक उमेश तिडके यांनी व आभार प्रदर्शन निखिल भड यांनी केले,
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता लोकजागर मंच व जगतगुरू प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
अधिक वाचा : अकोट मतदारसंघाच्या आमदारांचा वाढदिवस खड्यांमध्ये “बेशरम” चे झाड लावून केला साजरा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola