अकोट (देवानंद खिरकर) : अकोट तालुक्यातील लाडेगाव येथे विक्रांत नरेंद्र बोंद्रे यांच्या शेतात HTBt कपाशीवर अस्पा अग्री टेक नाशिक ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले, यावेळी कंपनीचे संचालक अजित खर्जुल यांनी सविस्तर मार्गदर्शन उपस्थित शेतकर्यांना केले.
तसेच शेतकरी संघटना युवा आघाडी अकोला चे अध्यक्ष विक्रांत बोंद्रे यांनी सांगितले की शेतकऱ्यांना दिवसेंदिवस होत असलेले फवारणी मार्फत विषबाधेचे लक्षण वारंवार दिसून येत आहेत, त्यामुळे बऱ्याच कंपन्यांनी ड्रोन फवारणी यंत्र विकसित केले आहे.
त्यामुळे मजुरीचा खर्च देखील कमी होतो आणि कमी कालावधीत श्रम, पाणी, औषध व वेळेची सुद्धा बचत होते हे यंत्र महाग असल्यामुळे सर्वसाधारण शेतकऱ्यांचे आवाक्याबाहेर आहे त्यामुळे शासनाने अनुदानावर हे यंत्र उपलब्ध करून द्यावी अशी माहिती उपस्थित सर्व शेतकऱ्यांमार्फत केली.
अधिक वाचा : पातूर पत्रकारांच्या वतीने उपेक्षित पत्रकाराचा केला जल्लोषात वाढदिवस साजरा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola