अकोट (देवानंद खिरकर) : १०-०७-२०१९ रोजी अकोट आगराची बसचा अकोट वरून अमरावती जात असतांना बसच्या मागील चाक निखळून शेतात गेले. परंतु चालकाच्या समय सुचकतेमुळे बस मधील चाळीस प्रवाशांचा जिव वाचले. संबंधित घटनेला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्या वर कठोर कारवाई करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने करण्यात आली. तसेच जेष्ठ नागरिकांना सवलती पास काढतांना मोठया प्रमाणात त्रास होत असुन जेष्ठ नागरिकांना दिवस दिवस भर रांगेत ऊभे राहुन होणारया त्रास पासुन मुक्तता करावी अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा अध्यक्ष प्रदिप वानखडे यांनी अकोट आगार व्यवस्थापक यांना दि.11 जुलै रोजी निवेदन देवून करण्यात आली यावेळी, ताध्यक्ष संदिप आग्रे मा. जिल्हा उपाध्यक्ष समिर पठान, सचिन सरकटे, अनिल सरकटे, अक्षय तेलगोटे, वासुदेव तेलगोटे, दिपराज खंडारे, सुरज चव्हाण, अजिंक्य वाळसे, रितिक पारेकर, सर्वेश जाधव, प्रदिप करवते, सुमेद सरदार, गणेश टेकाडे, गोलु धांडे, अजय डोंगरे, आकाश तेलगोटे, गौतम पचांग, स्वप्निल सरकटे तसेच यावेळी भारिप बहुजन महासंघाचे व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थिती होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola