अकोट : अकोट येथील पुरवठा विभागातुन प्राधान्य गटातील धान्य मिळविण्यासाठी पाच हजार केशरी शिधापत्रिका पायपीट करीत आहेत. पंरतु कार्यालयात कोणीच सापडत नसल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे कुटुंबासह तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे व जिल्हा दक्षता समितीच्या सदस्य नगरसेविका विजया बोचे यांनी दिला आहे.
शिधापत्रिकाधारकांना विविध योजनेअंतर्गत धान्य पुरवठा करण्याची जबाबदारी पुरवठा विभागामार्फत स्वस्त धान्य दुकानदार सोपवण्यात आली आहे. केसरी कार्डधारकांना धान्यपुरवठा बंद आहे. प्राधान्य गटातील पाच हजार केशरी कार्डधारक वंचित आहेत. पुरवठा कार्यालय व दुकानदार चालढकल करीत आहे. लोकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात मिळणारे शिधापत्रिकाधारकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कोणीही कार्यालयात हजर राहत नसल्याने महत्त्वाची कागदपत्रे शिधापत्रिका फाटलेले पडलेल्या आहेत. या कामाकडे अधिकार्यांचे दुर्लक्ष होत आहे.
याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क केला, त्यांच्याकडुन उडवाउडवीची उत्तर मिळत आहेत. तहसील पुरवठाचा कारभार पाहता प्रत्येक गरीब केसरी कार्ड धारकांना जो पर्यंत प्राधान्य गटातील धान्य देण्याची मागणी घेत २२ जुलै पासुन संपूर्ण कुटुंबासह तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे व जिल्हा दक्षता समितीच्या सदस्य नगरसेविका विजया बोचे यांनी दिली आहे.
अधिक वाचा : कोणत्याही चर्चेतुन वाद हमखास मिटवता येतात हिवरखेड ठाणेदार लव्हांगळे यांचे प्रतिपादन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola