अडगांव बु. (दिपक रेळे) : शेतकरी संघटना कडून अकोली जहागीर येथे सविनय कायदे भंग करून 10 जूनला तंत्रज्ञान स्वातंत्र्य भंडारा घेऊन शेतकरी स्वातंत्र्य करिता संघटनेने किसान सत्याग्रह, माझं वावर माझी पावर असे महाराष्ट्रात आंदोलन छेडले. गावागावातून या आंदोलनाला भरपूर प्रतिसाद मिळत असून पुन्हा एकदा शेतकरी संघटने तर्फे येत्या 24 जून ला तंत्रज्ञान स्वातंत्र्य भंडारा अडगाव बु येथे शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष (माहिती व तंत्रज्ञान आघाडी) लक्ष्मीकांत कौठकर यांच्या शेतात घेण्याचे जाहीर केले आहे. या आंदोलनात अकोट व तेल्हारा तालुक्यातील एक हजार शेतकरी भाग घेणार आहेत.
मागील नऊ वर्षांपासून G M तंत्रज्ञानच्या चाचण्या सरकारने बंद केल्या आहेत म्हणून स्वतः शेतकरी वैधनिकांची मदत घेऊन स्वतः HT Bt च्या चाचण्या घेण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. हरयाणा येथील शेतकऱ्यांचे वाग्यांचे उभे पीक शासनाने उपडून फेकले होते. त्या करिता महाराष्ट्रातील शेतकरी स्वतः कडून पैसे गोळा करून या शेतकऱ्याला मदत करणार आहेत. या भंडाऱ्यातून देशातील सर्व शेतकरी एक आहेत हा संदेश देणार आहेत. या भांडाऱ्यात तालुका अकोट व तेल्हारा मधून शेतकरी एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमाला शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट आणि पश्चिम विदर्भ महिला आघाडी सीमाताई नरोडे येणार आहेत.
या आंदोलनाचा समोरचा टप्पा म्हणून शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नवीन घोषणा करण्याची शक्यता वर्तविले जात आहे. 10 जून अकोली जहागीर येथून पेटलेले आंदोलन पूर्ण जिल्हा व्यापात आहेत. शेतकरी मोठ्या संख्येने यात आपला सहभाग दर्शवित आहेत .कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नऊ वाजता सकाळी सुरू होणार आहे.
दिवसेंदिवस शेतीवर भार वाढत असून दोन चार एक्कर मध्ये परिवाराचा उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे म्हणून शेतीला तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास शेतीवरील उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनात गुणवत्ता निर्माण होणार आहे. परंतु तंत्रज्ञान शेतकऱ्यांचे दार वाजवत असून शासन बंदी चा अट्टाहास करीत आहेत. तंत्रज्ञान वरील बंदी शासनाने उठवून HT Bt व GM तंत्रज्ञान च्या चाचण्या सुरू करून शेतकऱ्यांना तंत्रज्ञान मोकळे करावे ही मागणी जोर धरत आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola